google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 चक्क! कर्नाटकात जाताच आमदार शहाजी बापू पाटील यांचे आठ दिवसात नऊ किलो वजन घटलं!

Breaking News

चक्क! कर्नाटकात जाताच आमदार शहाजी बापू पाटील यांचे आठ दिवसात नऊ किलो वजन घटलं!

 चक्क! कर्नाटकात जाताच आमदार शहाजी बापू पाटील यांचे आठ दिवसात नऊ किलो वजन घटलं!

सांगोला : सांगोल्याचे शिंदे गटाचे तब्बल सव्वाशे किलो वजन असलेल्या आमदार शहाजी बापू पाटील यांनी एका आयुवेर्दिक हॉस्पिटलमध्ये जावून वजन कमी केले आहे.याबद्दल अधिक माहिती अशी की, हिवाळी अधिवेशनात शहाजी बापू हे दोन दिवस सहभागी झाले होते.

 त्यानंतर आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपले मित्र महेश पाटील यांच्या सोबत थेट कर्नाटकामधील श्री श्री कॉलेज ऑफ आयुर्वेदिक सायन्स अँड रिसर्च हॉस्पिटल या ठिकाणी पंचकर्म आणि सुदर्शन क्रिया करण्यासाठी दाखल झाले.

 मागील दहा दिवसांपासून शहाजीबापू पाटील बंगळुरुमध्ये मुक्कामी होते. बंगळुरूमधील आश्रमातील शहाजी बापू यांचा दिनक्रम 24 डिसेंबरपासून सुरु झाला. शहाजीबापूंनी अवघ्या आठ दिवसात नऊ किलो वजन कमी केलं आहे.

Post a Comment

0 Comments