google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भयानक घटना.. मुलीला नांदवत नाही या कारणावरून सासू-सासऱ्यांनी जावयालाच पेटवले

Breaking News

भयानक घटना.. मुलीला नांदवत नाही या कारणावरून सासू-सासऱ्यांनी जावयालाच पेटवले

 भयानक घटना.. मुलीला नांदवत नाही या कारणावरून सासू-सासऱ्यांनी जावयालाच पेटवले

 पती-पत्नीतील वादामुळे ते वेगळे राहत होते. त्यावरून सासू-सासऱ्यांनी जावयाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला.

त्यात जावई गंभीर भाजला आहे.

याबाबत लखन बाजीराव काळे (वय ३२, रा. शिरूर) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना खराडीमधील रिलायन्स मॉलकडून खराडीकडे जाणाऱ्या रोडवर शुक्रवारी सायंकाळी घडली. 

चंदननगर पोलिसांनी सासरे रंजित ऊर्फ गेंड्या याजिंदर भोसले, सासू बासुंदी रंजित ऊर्फ गेंड्या भोसले, साडू अलताफ विजय काळे, पत्नी पेडम लखन काळे, मेहुणा कावकर रंजित ऊर्फ गेंड्या भोसले (सर्व रा. झेन्सार कंपनीसमोर, खराडी) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला.

त्यामुळे त्याची पत्नी, मुलगा व मुलगी हे फिर्यादी सोबत राहत नाहीत. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता.शुक्रवारी सायंकाळी लखन हे झाडाखाली बसले असताना त्याचे सासू-सासरे व इतर तेथे आले. पत्नीस नांदवीत नसल्यावरून लखन यांना मारहाण केली.

 प्लास्टिकच्या बाटलीत आणलेले पेट्रोल लखन यांच्या अंगावर टाकून पेटवून दिले. त्यात लखन यांचे पोट, पाठ, गळा, छाती व दोन्ही हात भाजले. पोलिस निरीक्षक जानकर अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments