google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अपघातानंतर चार किमी फरफडत नेले ; मुलीचे पाय तुटून गेले होते रस्त्यावरून घासत गेल्याने मृतदेहाची झाली होती चाळण

Breaking News

अपघातानंतर चार किमी फरफडत नेले ; मुलीचे पाय तुटून गेले होते रस्त्यावरून घासत गेल्याने मृतदेहाची झाली होती चाळण

 अपघातानंतर चार किमी फरफडत नेले ;  मुलीचे पाय तुटून गेले होते रस्त्यावरून घासत गेल्याने मृतदेहाची झाली होती चाळण 

राजधानी दिल्लीतून एक हृदय  पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. स्कुटी वरून जाणाऱ्या तरुणीला कार ने चार किमी पर्यंत फरफडत नेले आहे. यामध्ये तरुणीचे दोन्ही पाय तुटले आहे.

 तर मृतदेहाची अक्षरशः चाळण झाली. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे ही घटना पाहणाऱ्या तरुणाने याबद्दल पीसीआर व्हॅन मध्ये बसलेल्या पोलिसांना सांगितले तर नशेत असलेल्या त्या पोलिसांनी त्याचे म्हणणे ऐकून घेतले नाही. घटना रविवारी सकाळी घडली आहे.

प्रत्यक्षदर्शी दीपक ने दिलेल्या माहिती नुसार एक कार तरुणीचा मृतदेह रस्त्याने घासत जात होती. रस्त्याने घासत गेल्याने मृतदेहाची अक्षरशः चलन झाली होती. त्याने बेगमपूर पर्यंत त्या कारचा पाठलाग केला. कार ला तरुणीचा मृतदेह अडकला असतांना ते कार इकडेतिकडे फिरवत होते,. जेव्हा मृतदेह कार मधून पडला तेव्हा ते निघून गेले.

कार कमी वेगात होती आणि ती चालवणारी व्यक्ती सामान्य असल्याचे दिसत होते. पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास दीपक दूध वितरणाची वाट पाहत होता. त्यावेळी त्याला एक कार येताना दिसली. त्या गाडीच्या मागच्या चाकांमधून मोठा आवाज येत होता.

डीसीपी हरेंद्र सिंह यांनी सांगितले की, रविवारी पहाटे तीन वाजता पोलिसांना कांझावाला परिसरात पीसीआर कॉल आला. रस्त्याच्या कडेला एक मुलगी विवस्त्र अवस्थेत पडल्याचे सांगण्यात आले. या माहितीनंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.

 या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असता, एक 23 वर्षीय तरुणी स्कूटीवरून आपल्या घराकडे जात असताना कारसोबत अपघात झाला. ती कारमध्ये अडकली. या कारने तिला चार किमीपर्यंत घसटत नेले. यामुळे तिचे कपडे फाटून वेगळे झाले. पोलिसांनी कारमधील पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

मुलीचा मृतदेह रस्त्यावरच पडून होता. अंगावर एकही कपडा नव्हता. रस्त्यावर ओढले गेल्याने मुलीचे पाय तुटून गेले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.

Post a Comment

0 Comments