विभागीय कुस्ती स्पर्धेत कोळा विद्यामंदिरचा दबदबा कायम
कोळे / प्रतिनिधि:- पढरपूर येथे 1 व 2 जानेवारी 2023 रोजी विभागीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत कोळा विद्यामंदिर हायस्कूलचा खेळाडू कु. एकलव्य तानाजी सरगर याने कुस्ती फ्री स्टाईल मध्ये ( 35 कि.ग्रॅ.) घवघवीत यश संपादन केले आहे.
तसेच कु. रियाज वजिर तांबोळी ( 12 वी कला ) याने रोमन ग्रिको ( 55 कि.ग्रॅ.) या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला असून एकलव्य व रियाज यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सदर खेळाडूला क्रीडा शिक्षक श्री.महादेव नरळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
वरील विद्यार्थ्यांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. पी.सी.झपके सर , सचिव म.शं घोंगडे सर,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब,
खजिनदार शंकरराव सावंत सर, कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके साहेब,सर्व संस्था कार्यकारिणी सदस्य, मुख्याध्यापक श्री.नारायण विसापुरे सर ,प्र.मुख्याध्यापक श्री.रफीक मणेरी सर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी ,पालक सर्व कोळे ग्रामस्त यांनी अभिनंदन केले व पुढील राज्यस्तरीय स्तरासाठी शुभेच्छा दिल्या.


0 Comments