google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कलबुर्गी- कोल्हापूर -कलबुर्गी रेल्वेस सांगोला स्थानकावर थांबा द्या अन्यथा रेलरोको :- अशोक कामटे संघटना रेल्वे सोलापूर विभागाची मेहरबान पुणे विभागावर

Breaking News

कलबुर्गी- कोल्हापूर -कलबुर्गी रेल्वेस सांगोला स्थानकावर थांबा द्या अन्यथा रेलरोको :- अशोक कामटे संघटना रेल्वे सोलापूर विभागाची मेहरबान पुणे विभागावर

 कलबुर्गी- कोल्हापूर -कलबुर्गी रेल्वेस सांगोला स्थानकावर  थांबा द्या अन्यथा रेलरोको :- अशोक कामटे संघटना


रेल्वे सोलापूर विभागाची मेहरबान पुणे विभागावर 

सांगोला (प्रतिनिधी)सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने मध्ये रेल्वे महाप्रबंधक , मुंबई यांना निवेदन देण्यात आले आहे.

रेल्वे गाडी क्रमांक 22155 & 22156कलबुर्गी- कोल्हापूर -कलबुर्गी  रेल्वे  सप्टेंबर2022 पासून नियमित धावत आहे सांगोला स्थानकावर थांबा देण्यात आलेला नाही ,

सांगोला रेल्वे स्टेशन हे अत्यंत महत्त्वपूर्ण स्टेशन असून अनेक प्रवासी इथून सोलापूर, मिरज ,कोल्हापूर, कलबुर्गी या  ठिकाणी दररोज अनेक विद्यार्थी नोकरी ,व्यवसाय , दवाखाना कामानिमित्त दररोज ये -जा करीत असतात, सदर रेल्वे सोलापूर विभागाची असून या विभागांमध्ये  केवळ दोनच थांबे असून उर्वरित थांबे हे पुणे विभागात आहेत .

कोल्हापूर ते मिरज हे अंतर 50 ते 55 किलोमीटर असून त्यामध्ये तीन थांबे मंजूर आहे मिरज ते सोलापूर या 290 कि मी मध्ये केवळ एक थांबा मंजूर आहे हा अन्याय सोलापूर रेल्वे विभाग स्वतःच आपल्या विभागावर करून घेत आहे हे यावरून स्पष्ट होते.

 त्यातच ही सुपरफास्ट रेल्वे तिच्या निर्धारित वेळेपेक्षा दररोज 30-40 मिनिटे उशिराने धावते ही सर्व सत्य परिस्थिती असताना सोलापूर रेल्वे विभाग अजून किती  दिवस दुर्लक्ष करून प्रवाशांच्या समस्या वाढविणार हा मोठा प्रश्न आहे ??

 त्याकरिता सांगोला स्टेशनवर तात्काळ थांबा मंजूर करावा या मागणीचा 26 जानेवारी 2023 पर्यंत  विचार न केल्यास येथील नागरिकांसमवेत शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत 

या संदर्भात आपल्या विभागात अनेक वेळा निवेदने व स्मरणपत्र 1,2 व 3 वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे या रेल्वेस जयसिंगपूर ,हातकणंगले असे थांबे देण्यात आले आहे मग सांगोला रेल्वे स्टेशन हा थांबा जाणीवपूर्वक वगळला आहे तरी या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. 

तरी प्रजासत्ताक दिनापर्यंत या मागणीची दखल न घेतल्यास प्रजासत्ताक दिनीच रेल रोको करणार असल्याचा इशारा दिला आहे अशी माहिती शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आली. 

या निवेदिनाच्या प्रती,

मा. रेल्वेमंत्री ,भारत सरकार दिल्ली,मा. महाव्यवस्थापक मध्य रेल्वे मुंबई,खासदार .रणजीतसिंह नाईक -निंबाळकर, आमदार . शहाजीबापू पाटील,

 मा. लोहमार्ग पोलीस निरीक्षक ,कुर्डूवाडी यांनाही देण्यात आल्याची माहिती शहीद कामटे संघटनेचे नीलकंठ शिंदे सर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments