google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डान्सर गौतमी पाटील लवकरच झळकणार वेब सीरिजमध्ये; म्हणाली, तुम्ही पाहालच.

Breaking News

डान्सर गौतमी पाटील लवकरच झळकणार वेब सीरिजमध्ये; म्हणाली, तुम्ही पाहालच.

डान्सर गौतमी पाटील लवकरच झळकणार वेब सीरिजमध्ये; म्हणाली, तुम्ही पाहालच.

डान्समुळे भुरळ पाडणारी डान्सर गौतमी पाटील आता वेब सीरिजमध्ये पदार्पण करणार असल्याचे समोर आले आहे. गौतमीने माध्यमांशी बोलताना याबद्दलची माहिती दिली आहे. अगदी काही दिवसांपासून गौतमी पाटील हे नाव तिच्या नृत्यामुळे चांगलेच प्रसिद्ध झाले आहे.

दरम्यान नृत्य करताना तिच्या हावभावांवरुन तिच्यावर टिका देखील करण्यात आली होती. त्यानंतर गौतमीने माफी मागत भविष्यात असा प्रकार पुन्हा होणार नसल्याचे तिने स्पष्ट केलं.

आता गौतमी वेब सीरीजमध्ये झळकणार असल्याचे समोर आले आहे. दोन-तीन गाणी आणि एक चित्रपट तसेच वेब सीरिज वगैरे चालू आहेत अशी माहिती गौतमी पाटील हिने दिली आहे. 

या वेब सीरीज आणि चित्रपट कुठले आहेत, तसेच त्यांच्या नावांबद्दल किंवा त्यांच्या विषयाबद्दल अद्याप गौतमीने कुठलाही खुलासा केलेला नाहीये. ते आत्ताच सांगता येणार नाही, तुम्ही पाहालच असे तिने सांगितेल.

दरम्यान सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील ही चांगलीच व्हायरल झाली आहे. काही दिवसांपूर्वा सांगली जिल्ह्यातील बेडग गावामध्ये झालेल्या तिच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची प्रचंडी गर्दी लोटली होती. 

या गर्दीमुळे जवळच असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं होते. त्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली.

Post a Comment

0 Comments