google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यात फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट, तिघांचा मृत्

Breaking News

सोलापूर जिल्ह्यात फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट, तिघांचा मृत्

सोलापूर जिल्ह्यात फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट, तिघांचा मृत्

सोलापूर : नववर्षाचं स्वागत अग्नितांडवानं झालं आहे. नाशिकच्या जिंदाल पॉली फिल्म कंपनीला आग लागल्याची घटना ताजी असतानाच सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये पांगरी गावाजवळ फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्यानंतर आग लागली आहे.


 बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळील ही घटना आहे. फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना ही घटना घडली. स्फोट झाला तेव्हा फटाका फॅक्टरीमध्ये जवळपास ४० कर्मचारी काम करत होते अशी प्राथमिक माहिती आहे. 

स्थानिक ग्रामस्थांनी आणि अग्निशमन दलाने आग नियंत्रित केली असून फॅक्टरीमधील सर्व कर्मचाऱ्यांना उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.स्फोटादरम्यान तीन महिलांचा जाग्यावरच मृत्यू झाला आहे.

तिन्ही महिलांचे मृतदेह पांगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.एका रुग्णाची परिस्थिती अत्यंत नाजूक झाल्याने त्याला उपचारासाठी उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

जखमी बार्शीच्या रुग्णालयात

बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळील एका फटाका फॅक्टरीत मोठी दुर्घटना घडली आहे. फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना झाला भीषण स्फोट झाला आहे.फटाका फॅक्टरीमध्ये जवळपास ४० कर्मचारी काम करत होते. 

या घटनेतील जखमींना बार्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्थानिक ग्रामस्थांनी व अग्निशमन दलाने आग नियंत्रित केली असून फॅक्टरीमधील सर्व कर्मचाऱ्यांना उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Post a Comment

0 Comments