google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आई उपचारासाठी रुग्णालयात असताना‌ सख्‍ख्‍या भावानेच केली भावाची हत्‍या

Breaking News

आई उपचारासाठी रुग्णालयात असताना‌ सख्‍ख्‍या भावानेच केली भावाची हत्‍या

 आई उपचारासाठी रुग्णालयात असताना‌ सख्‍ख्‍या भावानेच केली भावाची हत्‍या

परभणी : आपसी वादात सख्या भावाने भावाची निर्घृणपणे हत्या केल्‍याची धक्‍कादायक घटना घडली आहे. अनेक दिवसानंतर दोन्ही भाऊ एकत्र आले होते. एकत्र येताच दोघात आपसी वाद झाला आणि याच वादातून भावाने भावाची हत्या  केल्‍याची माहिती समोर येत आहे.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी घटना घडल्याने शहरात खळबळ निर्माण झाली. 

परभणी  शहरातील मराठवाडा प्लॉट परिसरात ही घटना घडली आहे. हत्येचे नेमके कारण अद्याव समजू शकलेले नाही. 

परभणी शहरातील मराठवाडा भागात सख्या भावाने भावांचा काचेचा ग्लास व पाण्याची कळशी मारून खून केला. ही घटना मध्यरात्रीच्‍या सुमारास घडली आहे. सतीश कोंडीबा वाघमारे असे खून झालेल्या भावाचे नाव असून, त्याचा सख्या भाऊ सुनील कोंडीबा वाघमारे असे आरोपी भावाचे नाव आह़े.

आई रुग्णालयात दाखल

जन्मदाती आई रुग्णालयात उपचार घेत असताना दोन संख्या भावांचे आपसी वादात भांडण झाले. यात एका भावाने काचेच्या ग्लासाने व पाणी भरण्याच्या कळशीने वार करीत भावाची निर्घृणपणे हत्या केली. खून झाल्याची माहिती कळताच नानलपेठ पोलिसांनी घटने पंचनामा केला. आरोपी सुनील वाघमारे याच्‍यावर खुनाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

Post a Comment

0 Comments