कोल्हापूरमध्ये एक दुर्दैवी घटना जेसीबीखाली चिरडून 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. आज सकाळी रंकाळा टॉवर इथं जेसीबीचा धक्का लागल्याने मोटरसायकलवरून पडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
अनुराधा मिलिंद पोतदार असे या अपघातात मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. या दुर्दैवी अपघाताची नोंद सीपीआर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
काय घडले नेमके?
अनुराधा पोतदार या फुलेवाडी येथून दुचाकीवरून कोल्हापुरात येत होत्या. दरम्यान त्या रंकाळा टॉवर परिसरात आल्या असताना शेजारून निघालेल्या जेसीबीचा धक्का त्यांच्या दुचाकीला लागला आणि अनुराधा या रस्त्यात कोसळल्या . यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांनी जागीच आपला जीव सोडला. अनुराधा या पोतदार सूर्या हॉस्पिटलमध्ये रिसेप्सनिस्ट म्हणून नोकरी करत होत्या.
शनिवारी सकाळी त्या दुचाकीवरून पतीसोबत हॉस्पिटलकडे निघाल्या. दरम्यान, जेसीबीच्या बकेटचा धक्का दुचाकीला लागला. यावेळी दुचाकीवरुन पडून अनुराधा जेसीबीच्या डाव्या बाजूच्या मागील चाकाखाली सापडल्या. यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यागोदरच त्यांचा मृत्यू झाला होता.
अनुराधा यांचे पती मिलिंद हे उद्यमनगरमधील एका खासगी कंपनीत काम करतात. या अपघातात ते किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पोतदार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


0 Comments