google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला विद्यामंदिरचा अमोल आमुणे कडलास मॅरेथॉन मध्ये प्रथम

Breaking News

सांगोला विद्यामंदिरचा अमोल आमुणे कडलास मॅरेथॉन मध्ये प्रथम

 सांगोला विद्यामंदिरचा अमोल आमुणे कडलास मॅरेथॉन मध्ये प्रथम 

कडलास :2023 नववर्षाचे स्वागत आरोग्यदायी चळवळीने करण्यासाठी झालेल्या कडलास मॅरेथॉन दहा किलोमीटर स्पर्धेमध्ये अमोल नानासो आमुणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तरुणाई व्यसनाधीनतीकडे नव्हे तर व्यायामाकडे ओढली जावी 

या उद्देशाने जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री सचिन पवार यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत 600 पेक्षा जास्त धावपटूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धा पुरुष व महिला दोन्ही गटात दोन किलोमीटर ,तीन किलोमीटर ,पाच किलोमीटर व दहा किलोमीटर प्रकारात झाली .

स्पर्धेचे विजेते :2km गट: इयत्ता पाचवी ते सातवी: मुले प्रथम  कार्तिक राहुल साळुंखे पंढरपूर द्वितीय  सुरज विजयकुमार साळुंखे पाटील जवळा तृतीय  श्रीयश दिनेश सुरवसे कडलास 

मुली :प्रथम रोहिणी राजेंद्र पवार कडलास द्वितीय  अंजली विजय गायकवाड कडलास तृतीय  सायली संजय गायकवाड कडलास 3km:आठवी ते दहावी गट: मुले :प्रथम रमेश अण्णासो वगरे  हबिसेवाडी द्वितीय निखिल धोंडीराम झुरे, कोंबड वाडी तृतीय ज्ञानेश्वर दादासो मदने कोळे

  मुली :प्रथम  ज्योती जगन्नाथ गडदे गौडवाडी द्वितीय  पूजा भाऊसो मासाळ, शिरभावी तृतीय  श्रद्धा राजाराम भगत सांगोला 

5km खुलागट: मुले: प्रथम सुनील राजाराम माने द्वितीय  स्वराज्य देवानंद पाटील सांगली तृतीय उमेश अंकुश सरगर, कोळा 

मुली: प्रथम श्रद्धा भारत हाके पाटकळ द्वितीय साक्षी संगाप्पा सरगर तृतीय गायत्री शांतीलाल मासाळ

 10 km खुला गट: पुरुष प्रथम अमोल नानासो आमुणे सांगोला द्वितीय पांडुरंग अण्णासो चौगुले तृतीय महादेव गजानन कोळेकर सलगरे 

मुली :प्रथम साक्षी उत्तम भंडलकर महूद द्वितीय सौ रेखा दादासो पवार कडलास तृतीय श्वेता सिद्धेश्वर माने कडलास स्पर्धेदरम्यान स्पर्धकांना टी-शर्ट व रोख  बक्षिसासाठी मा  सचिन पवार व डॉ पांडुरंग गव्हाणे यांनी सहकार्य केले. स्पर्धेत कडलासच्या नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला व सहकार्य केले. 

कडलास येथील दूध संकलन केंद्राच्या वतीने दूध वाटप करण्यात आले.श्री उद्धव बुवा गायकवाड यांनी नाश्ता वाटप केले. स्पर्धा घेण्यासाठी पंढरपूर रनर असो. कडलास हाय स्कूल, बहुउद्देशीय प्रशाला, श्री साई स्पोर्ट्स क्लब ,शंभुराजे अकॅडमी राजे गणेश मंडळ या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.

बक्षीस वितरण कडलाचे सरपंच दिगंबर भजनावळे निलेश माने, सांगोला सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन ऍड नितीन गव्हाणे, समाधान पवार, अनुराधाताई पाटील, शहाजी पाटील सर, तानाजी पाटील, उद्योजक कोडग साहेब, सुनील भोरे सर विस्तार अधिकारी लिगाडे साहेब चंद्रराव मॅडम यांचे शुभ हस्ते करण्यात आले. आभार संयोजक श्री दीपक टापरे सर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments