नाझरा ता.सांगोला येथे ज्वेलरी दुकान समोर मासे विक्रीचे दुकान मांडण्याच्या कारणावरून ज्वेलरी दुकानदार महिलेसह ४ जणांना जबर मारहाण !
सांगोला तालुका/प्रतिनिधी ; नाझरे ता.सांगोला येथे दर शुक्रवारी आठवडा बाजार भरतो या बाजारात मासे विक्री करण्यासाठी आलेल्या समाधान पवार या मासे विक्रेत्याला नाझरे येथील दादासाहेब वाघमोडे यांनी नाझरे गावातील बाजार पटांगणाजवळ असलेल्या ज्वेलरी दुकान समोरच मासे विक्रीचे दुकान लावण्यासाठी सांगितले या ज्वेलरी दुकान समोर मासे विक्रचे दुकान का लावू देत नाही
या कारणावरून ज्वेलरी दुकानदार सरस्वती चव्हाण यांच्यासह कन्हैया चव्हाण, गणेश चव्हाण, अनिल मंडले, धनाजी चव्हाण यांना लोखंडी गजाने,खो-यांच्या दांड्याने,वेळुच्या काठीने, तसेच लाकडी दांडक्याने डोक्यात, हातावर, पाठीवर जबर मारहाण करून जखमी केले आहे.
सदर घटनेची सांगोला पोलिसांत सरस्वती चव्हाण यांनी १.दादासो वाघमोडे ,२.तुकाराम वाघमोडे,३.दत्तात्रय खरात,४.योगेश वाकडे,५.तुषार वाघमोडे,६.भैय्या वाघमोडे,७.दादासो खरात सर्वजण राहणार नाझरे ता.सांगोला यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० कलम
३२४,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४८,१४९ व ३२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कलमानुसार गुन्हा दाखल झाला असताना सांगोला पोलीस स्टेशन येथे नेमणूकीस असणारे ठाणे अंमलदार श्री.बनसोडे यांनी सदर गुन्ह्याचा कोणताही तपास झाला
नसताना फिर्यादी मध्ये खाडाखोड करून ३२६ हे कलम कमी करून फिर्यादी महिलेवर अन्याय केला आहे. सदर घटनेतील आरोपींना मदत करण्याच्या उद्देशाने ठाणे अंमलदार यांनी आपल्या कार्यालयीन कर्तव्यात कसूर केला आहे.
त्यामुळे संबंधित ठाणे अंमलदार यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी अन्यथा जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने सांगोला पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात येईल. अशी मागणी जय मल्हार क्रांती संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश मंडले यांनी दिली आहे.


0 Comments