google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला वाटंबरे येथील माण नदीपात्रातून टाटा कंपनीचा ४०७ टेम्पो अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पलटी ; मंगेवाडी येथील प्रकार

Breaking News

सांगोला वाटंबरे येथील माण नदीपात्रातून टाटा कंपनीचा ४०७ टेम्पो अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पलटी ; मंगेवाडी येथील प्रकार

 सांगोला वाटंबरे येथील माण नदीपात्रातून टाटा कंपनीचा

४०७ टेम्पो अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पलटी ; मंगेवाडी येथील प्रकार

पोलीस आणि महसूल प्रशासन मात्र डोळ्यावर गांधरीची पट्टी बांधून “अळी मिळी गुप चिळी” ची भूमिका

सांगोला : विशेष प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील माण, कोरडा, बेलवण, अफ्रुका तसेच इतर छोट्या मोठ्या ओढे आणि नाल्यातून बेसुमार उपसा सुरू असताना पोलीस आणि महसूल प्रशासन मात्र डोळ्यावर गांधरीची पट्टी बांधून

 “अळी मिळी गुप चिळी” ची भूमिका घेऊन बसले असल्याचे भयावह चित्र सध्या सांगोला तालुक्यात पाहायला मिळत आहे. बुधवार दि ११ रोजी दिवसाढवळ्या वाळू वाहतूक करणारा टेम्पो पलटी झाल्याने हा महत्त्वपूर्ण प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सांगोला शहर आणि तालुक्यात अवैध आणि चोरटी वाहतूक जोमाने सुरु आहे.तक्रारी आणि गुप्त माहिती मिळताच महसूल प्रशासन कारवाई करीत आहे. पण वाळू माफियांच्या दहशतीला घाबरून तक्रार देण्यास नागरिक पुढे येत नाहीत. त्याचाच परिणाम म्हणून वाळू माफिया कुणाला ही न घाबरता बिनदिक्कतपणे वाळू विकत आहेत.

बुधवारी पहाटे ६.०० च्या सुमारास वाटंबरे येथील माण नदीपात्रातून टाटा कंपनीचा ४०७ टेम्पो वाळू भरून यलमार मंगेवाडी गावाच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना पायोनियर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या जवळ चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उलटला.

 यामध्ये असणारा चालक मात्र सुदैवाने बचावला. पहाटेच्या सुमारास व्यायाम करण्यासाठी आलेल्या नागरिकाना अतिशय वेगाने वाहतूक करणाऱ्या या गाडीचा थरार अनुभवास मिळाला. तर या पूर्वीही पहाटेच्या सुमारास दुचाकी वाहनांचा आणि वाळू वाहतूक करणाऱ्या गाडीचे किरकोळ अपघात झालेले नागरिकांनी अनेक वेळा पाहिले आहेत. 

पहाटेच्या सुमारास व्यायाम करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी सदरचा प्रकार फोनवरून गावकामगार तलाठी यांना सांगितला आणि मग प्रशासनाला जाग आली. सदर टेम्पोवर महसूल प्रशासन काय कारवाई करणार, हे पहावे लागणार आहे.

दरम्यान सांगोला तालुक्यात दिवसा ढवळ्या सुरू असणारी अवैध वाळू वाहतूक नेमकी कुणाच्या कृपा आशीर्वादाने सुरू आहे..? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे. 

तहसीलदार अभिजीत पाटील, सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी आणि उपविभागीय प्रांत अधिकारी यांनी या गंभीर प्रकरणाकडे तात्काळ लक्ष देऊन वाळू वाहतूकीचा सुरू असणारा गोरख धंदाबंद करावा अशी मागणी नागरिकांतून पुढे येऊ लागली

शहरातही वाळूच्या वाहनाने केला होता थरार..!

सोमवार दि ९ जानेवारी रोजी शहरातील वाढेगाव नाका येथून जात असलेल्या एका दुचाकीस्वाराला वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली होती. 

यामध्ये सुदैवाने दुचाकीस्वार बचावला असला तरी त्याची दुचाकी वाळूच्या वाहनाला अडकून तब्बल ३०० ते ४०० मीटर फरफटत गेली असल्याचे अनेक नागरिकांनी पाहिले होते. मात्र याबाबत प्रशासनाने अजूनही ठोस भूमिका न घेतल्याने “माजलेल्या माफियांना लगाम घालणार तरी कोण…?”  असाच सवाल आता पुढे येऊ लागला आहे.

Post a Comment

0 Comments