google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विधवा कामगार महिलेवर कंपनीच्या मालकासह कामगारांनी केला बलात्कार

Breaking News

विधवा कामगार महिलेवर कंपनीच्या मालकासह कामगारांनी केला बलात्कार

 विधवा कामगार महिलेवर कंपनीच्या मालकासह कामगारांनी केला बलात्कार 

पिडीता पाच-सात महिन्यांची गरोदर?पाच जणांवर गुन्हा दाखल, तिघांना अटक दोन मालकांसह मैनेजरला ठोकल्या बेड्या दि. १३ जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी

आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

कर्जत :- असहाय्यतेचा फायदा घेऊन समाजातील नराधम महिला, मुलींवर राजरोसपणे अत्याचार करीत असल्याचे दिसून येत आहे. अत्याचार करणाऱ्या नराधमांना कुठलाही जात, धर्म नसतो. 

त्यामुळे अशा नराधमांना कठोरातील कठोर शासन झालेच पाहिजे, अशी मागणी समाजातून होत असते. परंतु, समाजात महिला मुलींवर होणा-या अत्याचारांमध्ये घट होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे भयावह चित्र समोर येत आहे. अशीच एक भयंकर अत्याचाराची घटना कर्जत तालुक्यात फिल्टर पाण्याच्या कंपनीत घडली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील धुळेवाडी येथील एका फिल्टर पाणी बनविणा-या कंपनीतील विधवा कामगार महिलेवर कंपनीच्या मालकांसह मैनेजर व कामगाराने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, पीडित महिला ही पाच ते सात महिन्यांची गरोदर असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

 या प्रकरणात पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात तीन मालक, एक मैनेजर व एक बाजूच्या घरातील केअरटेकर असल्याचे समजते. यापैकी दोन मालकांसह मैनेजरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर एक मालक व केअरटेकर फरार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

कर्जत पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरुद्ध गु.र.नं.04/2023 भा.दं.वि.क.376,376(2),(f),(n), 376(c), 376(d), 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील तीन आरोपी यांना अटक करण्यात आले.

 असून कर्जत कोर्टात (न्यायालयात) हजर केले असता त्यांना १३ तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. तर दोन आरोपी फरार असून यांचा शोध कर्जत पोलीस करीत आहेत. कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोसई महेश धोंडे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments