सागोला तालुक्यातील खडी क्रेशर सुरु करणे बाबत. क्रेशर युनियन यांची पत्रकार परिषद
बांधकाम ठेकेदार, सेट्रींग कामगार, गवडी, यांना काम नसल्याने त्यांच्या कुटुंबाचा उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण
सांगोला -२७ डिसेंबर पासून सांगोला तालुक्यातील सर्व खडी मा. महसूल मंत्री यांच्या तोंडी आदेशावरुन मा. जिल्हाधिकारी सो सोलापूर यांनी बंद केलेले आहेत.
मा. तहसिलदार सो सांगोला यानी सर्व खडी क्रेशर सिल करून त्यांच्या आदेशाने सर्व खडी क्रशरचे विदयुत पुरवठा खंडीत केले आहेत. आतापर्यंत आम्ही सर्व खडी कशर धारकांनी दगड खाण व खडी क्रेशर यांचे परवानगीचे सर्व प्रस्ताव तहसील कार्यालया मार्फत जिल्हाधिकारी यांना सादर केले आहेत.
परंतु अदयापही प्रस्ताचावर योग्य ती कार्यवाही झाली नाही. तसेच वेळोवेळी E.T.S मार्फत झालेल्या मोजणीनंतर आम्ही सर्व रक्कम ही भरलेली आहे. तरीही मा. तहसीलदार सो सांगोला यानी सर्व खडी क्रेशर सिल करुन खडी क्रशरचा विदयुत पुरवठा खंडीत केला आहे
तेव्हापासून खडी क्रेशरवर अवलंबुन असणारे मजुर, चालक, त्या संबधीत काम करणारे बांध काम ठेकेदार, सेट्रींग कामगार, गवडी, यांना काम नसल्याने त्यांच्या कुटुंबाचा उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण होवुन कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
तालुक्यामध्ये मोठया प्रमाणावर आमदार निधी तसेच D. P.D.C., PWD, ZP., PMJSY तसेच खाजगी लोकांची घरकुले व घरे, रस्ते, बंधारे कॅनालचे अस्थीरकरण, पुल, या सारखी विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत.
व त्यासाठी खडी व क्रेशर सॅण्ड महत्वाचा भाग आहे. जर शासनाने सर्व परवानगी न देताच बंद केले तर तालुक्यातील वरील विकास कामावर फार मोठा परिणाम होवून सर्व आर्थीक फंड परत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच इतर जिल्हयाप्रमाणे मा. तहसिलदार सो सांगोला यांना ५०० ब्रास गौण खनिज ची रॉयल्टी भरुन घेणेचा अधिकार देण्यात यावा.तसेच आम्हा खडी क्रेशर धारकास पर्यावरण दाखला व इतर कागदपत्रांची पुर्तता करण्यास ६ महिने मुदत मिळावी. तरी सदर बाब आपले स्तरावरुन शासनास अवगत करुन खडी क्रेशर सुरु करणेस परवानगी मिळावी ही विनंती.



0 Comments