google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात भेट सांत्वनपर आधाराची पण चर्चा मा.आम.दीपक आबांच्या जागेवरच्या कामाची

Breaking News

सांगोला तालुक्यात भेट सांत्वनपर आधाराची पण चर्चा मा.आम.दीपक आबांच्या जागेवरच्या कामाची

सांगोला तालुक्यात भेट     सांत्वनपर आधाराची पण चर्चा मा.आम.दीपक आबांच्या जागेवरच्या कामाची

  सांगोला तालुक्याचे लोकनेते कार्यसम्राट मा आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचं काम म्हणजे एक घाव दोन तुकडे .

 जिथे कुठे आबा जातील तिथे काम करून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची गर्दीच होते. अडल्या नडल्यांच्या , गोरगरिबांच्या कामासाठी 24 तासात कधीही आबा एका फोनवर सहज उपलब्ध होणारे मा आ दीपक आबांचा एक फोन संबंधित असलेल्या अधिकारी वर्गाला जावा हा त्या सामान्य माणसांसाठी एक प्रकारची संजीवनीच असते 

   त्याच निमित्त अस की काल जूनोनी पंचक्रोशीतील प्रसिद्ध वस्ताद पैलवान दगडू चौगुले यांच्या मातोश्री  हौसाबाई चौगुले यांच्या निधनानंतर  पै. दगडू चौगुले यांच्या जूनोनीतील  निवासस्थानी सांत्वनपर भेटीसाठी लोकनेते आबा हजर होताच  पदाधिकारी  ग्रामस्थांनी आपल्या विविध प्रकारच्या अडचणींसाठी आबा समोर नागरिकांनी गर्दी केली.

 अश्या वेळी मागे सरतील ते आबा कसले आबांनी काही वेळातच  शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्याना अनुदानाचा प्रश्न , जुनोनी गावातून एसटी आतून येण्याचा प्रश्न , गावातील दोन प्रमुख रस्त्यांचा प्रश्न अशा अनेक प्रश्नांची सोडवणूक चुटकीसरशी संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा करून सोडवून टाकले.

     यामुळे दीपक आबांच्या हजरजवाबी , जागेवर बसून केलेल्या तात्काळ केलेल्या कामाची चर्चा जुनोनी पंचक्रोशी मध्ये रंगू लागली पण प्रसंग  सुखाचा असो वा दुःखाचा गेली 35 वर्षे जिथे जाईल तिथे जागेवर काम करून देण्याच्या पद्धतीमुळे आणि फोनवर सहज उपलब्ध होने हे आबांच्या रक्तातच असल्याने जूनोनीसह तालुक्यातील सामान्य जनता दीपक आबांच्या कामावरती फिदा आहे.

Post a Comment

0 Comments