सांगोला तालुक्यातील नाझरा येथे महिंद्रा थारची - मोटारसायकल धडकेत एक ठार, एक जखमी
घटना सांगोला तालुक्यातील नाझरा ते आटपाडी जाणाऱ्या रोडवर चव्हाणवस्ती जवळ १८ जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे. या अपघातात अजय सुभाष चव्हाण (रा. नाझरे) हा तरुण मयत झाला आहे.
नाझरे (ता. सांगोला) येथील अजय सुभाष चव्हाण (वय २९ वर्षे) व मल्हारी रघुनाथ चव्हाण( वय ३० वर्षे) हे दोन्ही युवक दिनांक १८ जानेवारी रोजी नाझरे गावात रात्रीच्या वेळी दूध घालून आपल्या हिरो होंडा दुचाकीवरून (क्रमांक एम एच ०१ एफ ३२६०) घरी नाझरे आटपाडी मार्गावरून परत येत असताना
खंडोबा मंदिरापासून २०० मिटर अंतरावरील ईदगाह मैदान नाझरे येथे त्यांना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या महिंद्रा थार (क्रमांक एम. एच ४५ ए.टी - ८० ५५) या गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरात ठोकर दिल्याने दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. अजय सुभाष चव्हाण हे उपच- रापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले.


0 Comments