google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 एक शिक्षिका तिच्या 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यासह पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Breaking News

एक शिक्षिका तिच्या 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यासह पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 एक शिक्षिका तिच्या 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यासह पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


 अजब प्यार की गजब कहानी! 23 वर्षीय शिक्षिका 16 वर्षांच्या विद्यार्थ्यासह पसार; नेमकं काय घडलं?

अजब प्यार की गजब कहानी! 23 वर्षीय शिक्षिका 16 वर्षांच्या विद्यार्थ्यासह पसार; नेमकं काय घडलं?

कोण, कधी, कोणाच्या, कसं प्रेमात पडेल ते सांगता येत नाही. अशीच एक अजब प्यार की गजब कहानी आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये एक शिक्षिका तिच्या 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यासह पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आता विद्यार्थ्याच्या वडिलांनी सेक्टर 113 पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाच्या अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर 123 मधील 22 वर्षीय शिक्षिका घरी मुलांचा क्लास घेते. शिक्षिकेच्या घरासमोर 16 वर्षांचा मुलगा राहतो. असे सांगितले जात आहे की, अल्पवयीन मुलगा क्लाससाठी शिक्षिकेकडे जात असे. याच दरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि दोघेही एकमेकांना आवडू लागले. रविवारी दोघेही घरातून पळून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

विद्यार्थ्याचे वडील मूळचे देवरियाचे आहेत. मुलाच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा 16 वर्षीय मुलगा रविवारी पहाटे दीडच्या सुमारास मावशीच्या घरी जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला, मात्र सायंकाळपर्यंत तो परतला नाही. समोर राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणीने फूस लावल्याचे अल्पवयीन विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. 

मुलाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाबाबत अतिरिक्त डीसीपी आशुतोष द्विवेदी यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मिळाली आहे की, हे प्रेमप्रकरणातून घडलं आहे. लवकरच दोघांचाही शोध घेतला जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Post a Comment

0 Comments