कुऱ्हाडीने वार करीत महिलेची हत्या, मृतदेहावर बलात्कार
नागपूर - शेतात कापूस वेचत असलेल्या महिलेवर 3 नराधमांनी सामूहिक बलात्कार करीत तिची कुऱ्हाडीने वार करीत हत्या करण्यात आली, इतकेच नव्हे नराधमांचे क्रूर कृत्य इतक्यावर थांबले नाही तर त्यांनी त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहावर सुद्धा बलात्कार केला.
खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या सुरेवानी गावात सदर घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
35 वर्षीय महिला ही सुरेवानी गावात राहत होती, वाघाच्या शिकार प्रकरणी त्या महिलेच्या पतीला अटक झाली होती, त्यामुळे ती महिला घरी एकटी राहत होती.
सध्या ती महिला शेतीची कामे करीत होती, 12 जानेवारीला ती महिला शेतात कापूस वेचत होती, याचा फायदा घेत आरोपी आबु उर्फ दिनेश उईके, नंदकिशोर उईके व सिद्धार्थ पाटील यांनी त्या महिलेकडे शरीर संबंधाची मागणी केली.
महिलेने नकार देतात तिघांनी तिला मारहाण करायला सुरुवात केली, त्यावेळी तिने आरडाओरडा केला मात्र शेतातील परिसरात कुणी नसल्याने त्या महिलेच्या मदतीला कुणी आले नाही. तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, त्यानंतर ती महिला त्यांचा प्रतिकार करीत असल्याने तिघांनी तिच्यावर कुऱ्हाडीने वार करीत हत्या केली.
काही वेळ आरोपी त्या महिलेच्या शेतात लपून होते, रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह शेतात पडला होता, मात्र एका आरोपीने त्या महिलेच्या मृतदेहावर पुन्हा बलात्कार केला.खापा पोलिसांनी आरोपींना अटक करीत सामूहिक बलात्कार व हत्येचा गुन्हा दाखल केला.


0 Comments