google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 फिल्म इंडस्ट्रीज मधील कामासाठी ऑडिशन द्यायला लावून १३ वर्षीय मुलीवर केला अत्याचार!

Breaking News

फिल्म इंडस्ट्रीज मधील कामासाठी ऑडिशन द्यायला लावून १३ वर्षीय मुलीवर केला अत्याचार!

 फिल्म इंडस्ट्रीज मधील कामासाठी ऑडिशन द्यायला लावून १३ वर्षीय मुलीवर केला अत्याचार!

पुणे: पुण्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रातील एका नामांकित उद्योजकाने ऑडिशन घेण्याच्या बहाण्याने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. राजेंद्र दगडु गायकवाड असे या उद्योजकाचे नाव आहे.

माहितीनुसार, आरोपी राजेंद्र हा घरी आला होता. यावेळी त्याने पीडित मुलीला फिल्म इंडस्ट्रीज मध्ये काम देण्याचं अमिष दाखवलं. त्यानंतर आरोपीने ऑडिशन घेत असल्याचं कारण देत, पीडितेच्या आई-वडीलांना घरातून बाहेर पाठवलं. 

आरोपीने ऑडिशन घेण्याच्या बहाण्याने पीडित मुलीला कपडे उतरवायला लावले. पीडित मुलीने कपडे उतरवताच, आरोपीने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. अत्याचारानंतर आरोपी राजेंद्र हा तेथून तातडीने निघून गेला.

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर पीडितेने आपल्यावर अत्याचार झाल्याचं आई-वडीलांना सांगितलंत्यांनतर पीडितेच्या आई-वडीलांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठलं. 

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपी राजेंद्र दगडु गायकवाड याच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच, आरोपी राजेंद्र हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Post a Comment

0 Comments