सोलापूर बापरे शिपायाने 5 लाखाची मागितली लाच ; समाज कल्याण विभागातील शिपायाला बेड्या, एक मात्र पळाला...
सोलापूर : समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयातील भ्रष्टाचार मागील अनेक दिवसांपासून चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान एका शिक्षिकेची प्रलंबित पगार काढून दिल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून वरिष्ठांच्या नावे पाच लाखाची मागणी करणाऱ्या एका शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
यामध्ये सहभागी असलेला दुसरा शिपाई मात्र पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले. शिपाई पाच लाख कसे मागू शकतो यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून यामागे मोठा अधिकारी असावा अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
अशोक जाधव बसवनगर मंद्रुप येथे शिपाई असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे तर टेम्भुर्णी जय तुळजाभवानी माध्यमिक आश्रमशाळा किसन भोसले-पाटील हा पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले.
यातील तक्रारदार यांची पत्नी समाज कल्याणच्या एका आश्रम शाळेत शिक्षिका आहे त्यांचा प्रलंबित पगार काढल्या नंतर मोबदला म्हणून वरिष्ठांच्या नावे तब्बल पाच लाखाची मागणी करण्यात आली होती, याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली.
दरम्यान पैसे मागितल्याची खात्री झाल्यानंतर अँटी करप्शन विभागाने अशोक जाधव याला पकडले. पोलिसांनी जाधव याला पकडल्याची माहिती करतात किसन भोसले पाटील हा पळून जाण्यात यशस्वी झाला.
विशेष म्हणजे पोलिसांनी पकडलेला आरोपी अशोक जाधव हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता सहाय्यक आयुक्तांची ही चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदरची कारवाई उमाकांत महाडिक पोलीस निरीक्षक एसीबी सोलापूर, पोलीस अंमलदार पोना अतुल घाडगे, पोकों स्वप्नील सन्नके, सर्व नेम एसीबी सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.


0 Comments