पंढरपूर तालुक्यात अवैधरित्या सुरू असलेल्या सर्व खडीक्रशर वरील
यंत्र सामुग्री जप्त करून संबंधित अधिका-यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी ; दादासाहेब चव्हाण
पुणे प्रतिनिधी ; पंढरपूर तालुक्यात बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या सर्व खडीक्रशरवर कारवाई करून खडीक्रशरवरील सर्व यंत्र सामुग्री जप्त करण्यात यावी. आणि गेल्या वर्षभरापासून फक्त कागदावरच खडीक्रशर सिल केलेले दाखवून संबंधित अधिकारी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केले बदल त्यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.
या मागणीसाठी दादासाहेब चव्हाण यांचे विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे हलगी नाद अंदोलन संपन्न.पंढरपूर तालुक्यामध्ये महसूल विभागाने अवैधरित्या सुरु असलेले ८३ खडीक्रशर गेल्या वर्षी सिल केलेले आहेत. परंतु हे सर्व ८३ खडी क्रशर कागदोपत्रीच सिल आहेत.
प्रतेक्षात मात्र हे राजरोसपणे सुरु आहेत. महसूल अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने सुरू असलेल्या सर्व खडीक्रशरवर कारवाई करून संबंधित अधिकारी ,कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.अशी मागणी अंदोलनकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी केली आहे.



0 Comments