बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण विकास केंद्र भिगवन व बँक ऑफ महाराष्ट्र शिरभावी शाखा यांच्या वतीने धायटी येथे एक दिवशीय कार्यशाळा संपन्न.
सांगोला/प्रतिनिधी समाधान मोरे ता सांगोला धायटी येथे बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण विकास केंद्र यांच्या वतीने शेतकऱ्याने बँकेमध्ये येऊन आपले व्यवहार केले जातात परंतु बँकेच्या माध्यमातून ही शेतकऱ्यांना होणारे फायदे हे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत या उद्देशाने धायटी गावामध्ये पाणी व्यवस्थापन आर्थिक समावेशन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेसाठी धायटी गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बँकेकडून मिळणाऱ्या सुविधा व योजना यांचा लाभ कसा घेता येतो याचे मार्गदर्शन सर्व शेतकऱ्यांनी मार्गदर्शनासाठी आलेले नरहर कुलकर्णी यांच्याकडून घेतले.
बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण विकास केंद्र भिगवन व गावांमध्ये पाणी व्यवस्थापन आर्थिक समावेशन या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजित केली होती. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक नरहर कुलकर्णी हे उपस्थित होते तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले शाखाव्यवस्थापक वर्षा सुरवसे, धायटी गावच्या सरपंच वनिता संजय कोळेकर,
अधिकारी उमेश निकम, एच बी भालेराव, पोपट लकडे, देवा फलफले, व बँकेचे कर्मचारी तसेच मान्यवर शेतकरी बंधू व बचत गटातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कुलकर्णी यांनी उपस्थित शेतकरी यांना पाणी व्यवस्थापन तसेच पाण्याचे योग्य नियोजन ठिबक सिंचन तुषार सिंचन यावर मार्गदर्शन केले.
शाखाव्यवस्थापक वर्षा सुरवसे यांनी बँकेच्या विविध कर्ज योजनेची व आर्थिक साक्षरता या संदर्भात माहिती दिली. पोपत लकडे यांनी माती परीक्षण काळाची गरज, माती परीक्षण केल्याने योग्य त्या पिकांची लागवड करण्यास सोयीस्कर होते.
शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करणे गरजेचे असून या शेतीसाठी बँकेकडून अनुदानही देण्यात येते. तसेच माती परिक्षण प्रयोग शाळा भिगवण या विषयावर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश निकम सर यांनी केले. तसेच सूत्रसंचालन व उपस्थित सर्वांचे आभार देवा फलफले यांनी यांनी केले.


0 Comments