google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 संतापजनक घटना.. कोल्ड्रिंक्स मध्ये दारू पाजून अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार

Breaking News

संतापजनक घटना.. कोल्ड्रिंक्स मध्ये दारू पाजून अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार

संतापजनक घटना.. कोल्ड्रिंक्स मध्ये दारू पाजून अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार

अकोला - वाढदिवसावरून घरी परत येणाऱ्या 2 अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना पुढे आली आहे.

16 डिसेंम्बरला मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करून येत असताना 2 अल्पवयीन मुली घराकडे निघाल्या होत्या, वाटेत त्या मुलींना ओळखीचा युवक भेटला त्याने तुम्हाला घरी सोडतो असे म्हणत सोबत गाडीवर बसविले.

सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या पवन वाटिकेत त्या युवकाने दोघांना कोल्ड्रिंक्स पाजले, ते पिल्यावर दोघांना गुंगी आली, त्यानंतर त्या युवकाने दोन्ही मुलींना टेरेस वर नेले त्याठिकाणी मित्रांच्या साहायाने दोन्ही मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

पीडित मुलींपैकी एक 14 वर्षाची तर दुसरी 17 वर्षाची आहे.रात्री दोन्ही मुलींना घरी पोहचण्यास उशीर झाल्याने आई-वडिलांनी विचारणा केली असता त्या मुलींनी घडलेला सर्व प्रकार सांगितला, आई-वडिलांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदविली.

सदर प्रकरणाचा तपास सपोनि कांबळे करीत असून त्यांनी या प्रकरणी तीन युवकांना ताब्यात घेतले असून त्यामध्ये ऋषिकेश, करन, रोहित यांचा सहभाग आहे. 

ऋषिकेश याने त्या दोन्ही मुलींना गाडीवर बसवीत पवन वाटिकेत नेले होते, कोल्ड्रिंक्स मध्ये दारू टाकत त्यांना दिले, त्यांनतर दोघांना गुंगी आली, व तिघांनी त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केला.

याबाबत पोलिसांनी तिघांची चौकशी केली असून पुढील तपास सुरू केला आहे, वैद्यकीय अहवालानंतर सदर प्रकरणाबाबत स्पष्टता येईल.

Post a Comment

0 Comments