google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ‘जीएसटी कौन्सिल’च्या बैठकीत करवाढीबाबत मोठे निर्णय, तुमच्यावर काय परिणाम होणार..?

Breaking News

‘जीएसटी कौन्सिल’च्या बैठकीत करवाढीबाबत मोठे निर्णय, तुमच्यावर काय परिणाम होणार..?

 ‘जीएसटी कौन्सिल’च्या बैठकीत करवाढीबाबत मोठे निर्णय, तुमच्यावर काय परिणाम होणार..?

गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत जीएसटी कौन्सिलची 48 वी बैठक सुरु होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्हर्च्युअल माध्यमातून बैठकीत भाग घेतला. या बैठकीत वस्तूंवरील कर रचनेत काही बदल होतात का, याकडे व्यापारी, उद्योजकांसह सर्वसामान्यांचेही लक्ष लागले होते. मात्र, जीएसटी परिषदेने कोणत्याही वस्तूंवरील करात वाढ केलेली नाही.

तंबाखू, गुटख्यावर चर्चा नाही

जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत गुटखा, तंबाखू व ऑनलाईन गेमिंगवरील कर वाढविणार असल्याची चर्चा होती. मात्र, वेळेअभावी तंबाखू व गुटख्यावरील कराबाबत बैठकीत चर्चा झाली नाही. जीएसटी कौन्सिलमध्ये 15 पैकी फक्त 8 मुद्द्यांवर निर्णय झाला. पान मसाला व गुटखा व्यवसायातील करचोरी रोखण्यासाठी यंत्रणा बनवण्याबाबत निर्णय होऊ शकला नसल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले.

ऑनलाइन गेमिंग व कॅसिनोवर जीएसटी आकारण्याबाबत बैठकीत कोणतीही चर्चाच झाली नाही. मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील मंत्र्यांच्या गटाने (जीओएम) काही दिवसांपूर्वी या मुद्द्यांवर आपला अहवाल दिला आहे. वेळ कमी असल्याने जीएसटी कौन्सिलच्या सदस्यांनाही हा अहवाल देता आला नसल्याचे महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​यांनी ​​सांगितले.

डाळीची साल करमुक्त

जीएसटी कायद्याच्या अनुपालनातील अनियमिततेसाठी खटला चालवण्याची मर्यादा 1 कोटी रुपयांवरुन 2 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यास जीएसटी कौन्सिलने मान्यता दिली. तसेच, डाळींच्या सालींवरील जीएसटी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत डाळींच्या सालीवर पाच टक्के जीएसटी आकारला जात होता, पण आता तो शून्य केल्याचे महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments