google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ‘पब्जी’च्या व्यसनापायी विद्यार्थाची गळफास लावून आत्महत्या

Breaking News

‘पब्जी’च्या व्यसनापायी विद्यार्थाची गळफास लावून आत्महत्या

 ‘पब्जी’च्या व्यसनापायी विद्यार्थाची गळफास लावून आत्महत्या

आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील एका माध्यमिक विद्यालयात कृष्णा परमेश्वर साळवे हा शिक्षण घेतो. कृष्णाचे वडील ऊसतोडणीला असल्याने आई आणि तो दोघेच घरी होते. काही दिवसांपूर्वी कृष्णा हा शाळेच्या सहलीसाठी गेला होता.

 मात्र, सहलीवरून घरी आल्यानंतर तो झोपला. यावेळी आई बाहेर गेल्याचे समजातच त्याने राहत्या घरात दरवाज्याला आतून कडी लावून कपड्याच्या चिंध्यांनी केलेल्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. दरम्यान, या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाईलचा लहान मुलासह मोठ्यांनाही त्याचा छंद लागला आहे. तर मोबाईल हा अत्यंत चांगलाही तितकाच आहे आणि तो वाईटही तेवढाच आहे. कारण मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेकांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचेही आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो आणि ऐकतो. 

अनेक जण त्याच्या आहारी गेल्याचेही आपण पाहतो. अनेक लोकांना तर चक्क सकाळी उठल्यानंतर चहा पिण्याच्या अगोदरही मोबाईल लागतो. काय चालले आहे हे पाहण्यासाठी तो व्यक्ती मोबाईलमध्ये काय अपडेट आहेत हे पाहत असतो.

Post a Comment

0 Comments