google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वाह रे गुरुजी! प्राथमिक शिक्षकांची विद्यार्थ्यांसमोरच हाणामारी

Breaking News

वाह रे गुरुजी! प्राथमिक शिक्षकांची विद्यार्थ्यांसमोरच हाणामारी

 वाह रे गुरुजी! प्राथमिक शिक्षकांची विद्यार्थ्यांसमोरच हाणामारी

इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी आपापसात हाणामारी केली. शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळी विद्यार्थ्यांसमोर हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ वायरल झाला आहे. 

या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या शिक्षकांची बदली करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. नवीन शिक्षक येईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.सुभाष ब. भिटे, उद्धव कुंडलिक गरगडे, संजीवनी गरगडे अशी भांडणे करणा-या शिक्षकांची नावे आहेत. भिटे व संजीवनी गरगडे हे चाकाटीच्या जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत.

संजीवनी गरगडे यांचे पती उद्धव गरगडे हे लाखेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी भिटे व संजीवनी गरगडे यांची कुरबूर झाली. त्यानंतर शाळा सुटताना उद्धव गरगडे आल्यानंतर दोघांविरुध्द एक अशी धुमश्चक्री सुरु झाली.

Post a Comment

0 Comments