लग्नाच्या 6 वर्षांनी मामी पडली भाच्याच्या प्रेमात, दोन मुलांना सोडुन त्याच्यासोबत झाली फरार
उत्तर प्रदेशच्या झांसीमधून अनैतिक संबंधाची एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एक मामी आणि भाचा यांच्या प्रेम प्रकरण सुरू होतं. त्यानंतर भाचा मामीला घेऊन फरार झाला. मामी सुद्धा आपल्या दोन मुलांना सोडून भाच्यासोबत पळून गेली.
झालं असं की, एका महिलेने शहरातील प्रेमनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली की, तिचा मुलगा बेपत्ता आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेणं सुरू केलं. काही दिवसांनी पोलिसांना समजलं की, तो मध्य प्रदेशमध्ये आहे.
जेव्हा पोलीस तिथे पोहोचले तर तरूण त्याच्या मामीसोबत राहताना दिसला. यानंतर पोलिसांनी चौकशी केली तर समोर आलं की, भाचा आणि मामी पती-पत्नीसारखे राहत होते. दोघांनाही सोबत घेऊन पोलीस झांसीला आले आणि दोन्ही परिवारांना बोलवून याबाबत सांगितलं.
पोलिसांनी सांगितलं की, प्रेमनगर भागातील गढियागावातील संतोषचं(बदललेलं नाव) ६ वर्षांआधी राखी(बदललेलं नाव) सोबत झालं होतं. सध्या दोघांना दोन मुले आहेत. लग्नानंतर काही दिवसांनीच संतोषचा भाचा त्याच्या घरी येत-जात होता. हळूहळू मामी आणि भाच्यात जवळीक वाढली. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. एक दिवस दोघेही घरातून पळून गेले.
जेव्हा कुटुंबियांना मामी आणि भाचा यांची काही माहिती मिळाली नाही तर तरूणाच्या आईने पोलिसात तक्रार दिली की, त्यांचा मुलगा काही दिवसांपासून गायब आहे. बराच शोध घेऊनही त्यांचा पत्ता लागला नाही.
0 Comments