google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग! खासदार ओमराजे निंबाळकर जीवे मारण्याची धमकी

Breaking News

ब्रेकिंग! खासदार ओमराजे निंबाळकर जीवे मारण्याची धमकी

 ब्रेकिंग! खासदार ओमराजे निंबाळकर जीवे मारण्याची धमकी

उस्मानाबादमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांवर राजकीय वातावरण तापले आहे. अशात खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे आणि गावातील ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवाराला जीवे ठार मारण्याची धमकी आली आहे. तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द गावात प्रचारादरम्यान ही घटना उघडकीस आली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीतील राष्ट्रवादी किसान सेलचे प्रदेश सचिव ज्ञानेश्वर साळवे आणि त्यांच्या आई कांताबाई साळवे यांच्या घरावर अज्ञात व्यक्तीने हे धमकीचे पत्र चिकटवले आहे. निवडणुकीतून माघार घे पाठिंबा दे, नाही तर अवघड होईल, असा इशारा देण्यात आला आहे. ज्ञानेश्वर साळवे मदत कर. मतदानातून माघारी घे. पाठिंबा दे. नाही तर गावात राहायचं अवघड होईल. तुझा खासदार ओम बाळ, तुझा कलेक्टर व तुला नाही तर बघून घेऊ. वेळी आली तर संपवून टाकू.

हितून तुझ्या आईला मतदान कोण करतय ते आम्ही बघत आहोत. मतदान केंद्रात कोण जातय बघताव… वेळ आली तर तुला पण कायमचं संपवून टाकू, तुझा खासदार बाळ अन् कलेक्टरला पण परिणाम भोगावे लागतील. लय दलित समाजावर उड्या मारतोय काय…? अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments