सांगोला- आज याला सोडायचं नाही म्हणत रस्त्याच्या वादातून चाकूने भोसकले
पिता-पुत्रासह चौघांवर गुन्हा : लोखंडी रॉडनेही केली मारहाण
सांगोला रस्त्याच्या कारणावरून पिता-पुत्रांसह चौघांनी मिळून आज याला सोडायचं नाही, याचा खेळ संपवून टाकू, असे म्हणून एकाने भावकीतील तरुणास लोखंडी रॉडने डाव्या हाताच्या कोपऱ्याजवळ मारहाण करून चाकूने त्याच्या पोटात भोकसले.
तर त्याच्या वडिलाने हातातील कोयत्याने त्याच्या पोटावर वार करून गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी सकाळी ९.३० च्या सुमारास झापाचीवाडी (ता. सांगोला) येथे घडली.
याबाबत जखमी संजय यशवंत आलदर यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी समाधान आप्पासो आलदर, आप्पासो मारुती आलदर, रंजना आप्पासो आलदर, सारिका समाधान आलदर (रा. झापाचीवाडी, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ता.सांगोला फिर्यादी संजय आलदर हा तरुण गुरुवारी सकाळी ८.३० च्या सुमारास झापाचीवाडी येथील शेतात ट्रॅक्टरने
मारहाण करणारे चौघे जण पळून गेले....
जखमी अवस्थेतही समाधान व आप्पासो पिता-पुत्र त्यास मारहाण करीत होते. संजयने आरडाओरड केल्यामुळे अजित आलदर व समाधान आनंदर है तेथे आले. त्यावेळी मारहाण करणारे चौघे जण पळून गेले. त्या दोघांनी आरडाओरड करून चारचाकी वाहन बोलावून घेतले.
बेशुद्ध अवस्थेत त्यास सांगोला येथील खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केल्याचे त्याने फिर्यादीत म्हटले आहे.फवारणीसाठी गेला होता. शेतात फवारणी करून परत येत असताना समाधान आलदर, आप्पासो आलदर, रंजना आलदर व सारिका आलदर है त्यांच्या शेताच्या बांधाजवळ थांबले होते.
त्यावेळी समाधान याच्या हातात लोखंडी रॉड व आप्पासो यांच्या हातात लोखंडी कोयता होता, तर रंजना हिच्या हातात खोऱ्या होता. त्यावेळी समाधान याने ट्रॅक्टर थांबवून तू या रस्त्याने आयचे नाही, असे म्हणाल्याने त्याने टैक्टर तेथून वळवन घराकडे जात.
असताना समाधानने लोखंडी रॉड त्याच्या हाताच्या कोपऱ्याजवळ मारला. त्याने ट्रॅक्टर जागेवर सोडून पळून जाताना त्याला आप्पासो, रंजना व सारिका आलदार यांनी पकडून आज याला सोडायचे नाही, याचा खेळ संपवून टाकू, असे म्हणून आप्पासो रंजना व सारिका यांनी त्यास पकडले.
त्यावेळी समाधानने चाकू काढून त्याच्या डाव्या बाजूला पोटात भोसकले, तर आप्पासो आलदर यांनी लोखंडी कोयत्याने त्याच्या पोटावर वार केले.


0 Comments