google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पतीने झोपेतून पत्नीला उठवलं आणि मग जी मागणी केली, त्यावरुन घडली धक्कादायक घटना

Breaking News

पतीने झोपेतून पत्नीला उठवलं आणि मग जी मागणी केली, त्यावरुन घडली धक्कादायक घटना

 पतीने झोपेतून पत्नीला उठवलं आणि मग जी मागणी केली, त्यावरुन घडली धक्कादायक घटना

अमरोहा जिल्ह्यात एका पतीने पत्नीची हत्या केली. एकाच रात्री दोन वेळा शरीर संबंध ठेवण्यास पत्नीने नकार दिल्याने पतीने तिची गळा आवळून हत्या केली. ही धक्कादायक घडना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ माजलीय. ‘मला आणखी सेक्स करायचा नाही’, असं पत्नीने पतीला म्हटलं होतं. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. 

आरोपी पतीने पत्नीला झोपेतून उठवलं होतं आणि सेक्सची इच्छा व्यक्त केली होती. पहिल्यांदा संबंध ठेवून झाल्यानंतर पत्नी झोपी गेली. त्यानंतर पती पुन्हा जागा झाला आणि त्याने पत्नीलाही झोपेतून जागं केलं. यानंतर त्याने केलेल्या मागणीवर पत्नी संतापली होती. यातून त्यांच्यात जोरदार भांडण झालं होतं.

पत्नीने पतीसोबत संबंध ठेवण्यास नकार दिला होता. पत्नीचा नकार पचवणं पतीला जड केलं. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. भांडणादरम्यान तो एक दोरखंड घेऊन आला. याच दोरखंडाने त्याने पत्नीचा गळा आवळला आणि तिचा जीव घेतला.

यानंतर पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचाही त्याने विचार केला होता. त्याच दरम्यान, त्याने एका पॉलिथीनच्या मोठ्या गोणीत पत्नीचा मृतदेह भरला आणि 50 किलोमीटर दूर फेकला. आपण केलेलं हत्याकांड उघड होऊ नये म्हणून पती स्वतःच पत्नीची बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस स्थानकात गेला होता.

रुखसान नावाच्या महिलेसोबत अनवर याचं 2013 साली लग्न झालं होतं. रुखसार आणि अनवर यांना 3 मुलं आहेत. अनवर आपल्या घराच्या तळमजल्यावर एक बेकरीचं दुकान चालवतो. तर कुटुंब पहिल्या मजल्यावर राहत होते.

5 डिसेंबर रोजी पती-पत्नीमध्ये सेक्सवरुन खटका उडाला होता. त्यातून अनवर याने रुखसान हिची हत्या केली. मुरादाबाद पोलिसांना गेल्या मंगळवारी एका महिलेचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर मुरादाबाद पोलीस या हत्येप्रकरणी अधिक तपास करत होती. त्या दरम्यान, सापडलेला मृतदेह रुखसानचा असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांना अनवर याच्यावर संशय बळावला.

पोलिसांच्या चौकशीदरम्यान अनवर याने आपणच ही हत्या केल्याची कबुली दिली. अनवर रुखसान हिची हत्या करण्याच्या इराद्यात होता. सोमवारी सकाळी जेव्हा रुखसाना हीने अनवर याला संबंध ठेवण्यास नकार दिला, तेव्हा त्याने तिचा खून केला, अशी माहिती पोलीस तपासातून उघड झाली.

Post a Comment

0 Comments