google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात खुलेआम दारू विक्री सुरू सांगोला शहरासह ग्रामीण भागात विषारी दारूचा वास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष;

Breaking News

सांगोला तालुक्यात खुलेआम दारू विक्री सुरू सांगोला शहरासह ग्रामीण भागात विषारी दारूचा वास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष;

सांगोला तालुक्यात खुलेआम दारू विक्री सुरू सांगोला शहरासह ग्रामीण भागात विषारी दारूचा वास

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष; 

सांगोला शहरासह ग्रामीण भागातील गावोगावी विषारी हातभट्टी दारू विक्री व विना परवाना देशी, विदेशी दारू विक्री ही जोमात चालू आहे. या विपारी हातभट्टी दारूमुळे अनेक दारू पिणारे मरण पावले आहेत.

 तर अनेक जण मरणाच्या दादेवर आहेत. तसेच अनेकाचे दारूमुळे संसार उद्धवस्त झाले आहेत. या अवैध दारू विक्रेत्यावर किरकोळ कारवाई केली जाते. तर या पकडलेल्या किती दारू विक्रेत्यावर कोणत्या विभागात गुन्हे दाखल होतात. हा संशोधनाचा विषय आहे.

 अनेक वेळा महिन्यातून एकदा राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी खासगी गाडीघेऊन येतात. दारू विक्री करणाऱ्यांना पकडतात. त्यांच्याकडून एक हजार रुपये पासून दहा हजार रुपये पर्यंत रोख रकम घेतात व त्यांना त्याच ठिकाणी सोडून देतात, अशी चर्चा सुरू आहे. 

या अवैधहातभट्टी परवाना दारूला व विना देशी विदेशी दारूला राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी विभाग यांच्या आशीर्वादाने सांगोला तालुक्यात अवैद्य हातभट्टी दारू विक्री जोमात चालू आहे. याचा त्रास महिला सर्वसामान्य नागरिक यांना होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीयनि लक्ष देणे काळाची गरज आहे.

गल्ली बोळातील व्यावसायीकांनी सांगोला शहरासह ग्रामिण भागातील हातभट्टी व देशी विदेशी दारू विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. या विक्रेत्यांना हातभट्टी दारू पुरवठाकरण्यासाठी तालुक्यातील अनेक भागात हातभट्टीची केंद्र ही सुरू केली आहेत.

 ही हातभट्टी दारू युरिया,काही रासायनिक व केमिकल वापरून तयार केलेली ही दारू असते. त्यातच नासका गूळ इतर रासायनिक केमिकल यामुळे या दारूचा उग्र वास असतो. तसेच ही दारू अस्वच्छ भांड्यात वाटल्यात डब्यात ट्यूब मध्ये भरली जाते. 

यामळे हीदारू विषारी झाली आहे. ही हातभट्टी दारू ओढ्याला, डोंगर, दर्या झाडी यामध्ये तसेच अनेक ठिकाणी राजरोसपणे उत्पादन केली जाते. याकडे कोणाचीही लक्ष नाही. तर तालुक्या मध्ये गावोगावी एक ते पाच ठिकाणी गल्ली बोळात अवैद्य देशी- विदेशी दारू विक्रीची दुकाने थाटली आहेत.

 या दुकानदारांना राजरोसपणे दिवसा व रात्री चार चाकी दुचाकी गाडीवरून देशी व विदेशी दारूचे बॉक्स पोच केले जातात. हा व्यवसाय सध्या राज्य उत्पादन शुल्क च्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने मोठ्या धुमधडाक्यात सांगोला तालुक्यात चालू आहे. 

या अवैध व्यवसायामुळेसांगोला तालुक्यामध्ये अवैध दारू व्यवसायावर आमच्या विभागाकडे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत; पण याची माहिती सोलापूर येथील आयुक्तांकडून लेखी मागणी अर्ज करून घ्यावी. आम्हाला गुन्हे दाखल केलेल्याची माहिती देता येत नाही. 

संदीप कदम राज्य उत्पादन शुल्क अधिकारीसर्वसामान्याचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तर अनेक लोक मरणही पावले आहेत. सध्या बाजारपेठेमध्ये परवानाधारक दुकानात देशी दारूच्या बाटलीच्या किमतीपेक्षा दुप्पट किंमतीने विक्री केली जात आहे. 

तर हातभट्टी दारूची बाटली केवळ २० रुपयाला मिळते. ही दारू स्वस्त मिळत असल्यानेपिणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मात्र मागील काही महिन्यांपासून काही गुन्हेगारांवरती किवा अवैध धंदेवाल्यावरती ठोस त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जात आहे.

 कारवाई केली जात नाही. आता महिला वर्गातून केली

Post a Comment

0 Comments