वामनराव शिंदेसाहेब आदर्श विद्यालयात विद्यार्थी -शिक्षक दिन साजरा
सांगोला( प्रतिनिधी)आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित,वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन 2022-23 अंतर्गत दि. 28 डिसेंबर रोजी विद्यार्थी - शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्फुर्तपणे सहभाग नोंदविला. सकाळी शाळा सुरू झाल्यापासून सर्व विद्यार्थी-शिक्षकांनी नित्यनेमाप्रमाणे शिक्षकांची संपूर्ण जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली.
शाळा सुटण्यापूर्वी त्यांना आलेले अनुभव सर्वांच्या समोर सांगण्यास सांगितले. सर्व विद्यार्थी - शिक्षकांनी चांगले अनुभव मिळाल्याचे सांगितले तसेच शिक्षक होणे हे दिसते त्यापेक्षा फारच अवघड काम असल्याचे त्यांच्याकडून समजले.
शेवटी मुख्याध्यापक रमेश पवार सरांनी अध्यक्षीय भाषण केले त्यामध्ये त्यांनी त्यांचे वैयक्तिक अनुभव सांगितले तसेच विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शेवटी कुंभार सर यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रम संपल्याचे घोषित केले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


0 Comments