अनधिकृत गौणउत्खनन प्रकरणी कर्जतचे प्रांताधिकारी,तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई,
सांगोल्यातील अधिका-यांवर केव्हा कारवाई होणार ?
सांगोला तालुका/प्रतिनिधी ; कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या अवैध खडी क्रशरकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत कर्जतचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले व तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निलंबित करण्यात आले आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधिमंडळात ही माहिती दिली.
याप्रश्नी आ. राम शिंदे यांनी लक्ष्यवेधी सूचना मांडली होती. ज्या पद्धतीने कर्जत तालुक्यात बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन झाले आहे.
त्याच्या पेक्षाही कितीतरी पटीने जास्त गौणउत्खनन सांगोला तालुक्यात सुरू आहे.सांगोला तालुक्यातील अनेक खडीक्रशर कागदी घोडे नाचवून कागदपत्री सिल केलेल्या नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. प्रतेक्षात मात्र हे खडीक्रशर राजरोसपणे सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
सिल केलेले खडीक्रशर सुरू असलेला पुरावा म्हणजे या खडीक्रशर वरील लाईट बिल,या एका एका खडीक्रशर साठी १ महिन्याचे दिड ते दोन लाख रुपयांचे विज बिल येत आहे. जर हे खडीक्रशर सिल असतील तर मिटर रिडींग कसे काय सुरू आहे. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
त्यामुळे सांगोला तालुक्यातील गेल्या वर्षी सिल केलेल्या सर्व खडीक्रशरवरील वापर करण्यात आलेल्या मिटर रिडींग प्रमाणे त्या बेकायदेशीर सुरू असलेल्या खडीक्रशरवरील यंत्र सामुग्री जप्त करून दंडात्मक कारवाई करून संबंधित अधिकारी यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
केवळ आमदारांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला म्हणून त्या आमदारांच्या तालुक्यातील अधिका-यांवर कारवाई करून इतर तालुक्यातील बेकायदेशीर गौणउत्खननाचे प्रश्न सुटणार नाहीत.
त्यामुळे सांगोला तालुक्यातील बेकायदेशीर पध्दतीने सुरू असलेल्या अवैध खडीक्रशर तातडीने कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे कडून अहवाल घेवुन त्वरित कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केली जात आहे.


0 Comments