google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गौतमी पाटीलला पोलीस संरक्षण द्या, अन्यथा…

Breaking News

गौतमी पाटीलला पोलीस संरक्षण द्या, अन्यथा…

 गौतमी पाटीलला पोलीस संरक्षण द्या, अन्यथा… 

गौतमी पाटील हे नाव आता घराघरात पोहोचले आहे. तिच्या डान्सवर तरुण चाहते फिदा होत आहेत. तिच्या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

अनेक वेळा तर या गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तिला पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. तिच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढवत आहे. मात्र सध्या गौतमीवर अश्लीलतेचे आरोप केले जात आहेत.

ती नृत्य करताना अश्लील हावभाव करते, असा आरोप होत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत नाव गेलेल्या गौतमीच्या कार्यक्रमांवर बंदी आणावी, अशी मागणी अलीकडे होत आहे.

तर दुसरीकडे गौतमीला पोलीस संरक्षण देण्याची मागणी पुढे येत आहे. सांगली मधील दलित महासंघटनेने ही मागणी केली आहे. दरम्यान या मागणीसाठी दलित महासंघाने जोरदार निदर्शने केली. 

जर पोलिसांनी गौतमीला पोलीस बंदोबस्त दिला नाही तर गौतमीच्या कार्यक्रम ठिकाणी आमचेच कार्यकर्ते पाठवून बंदोबस्त ठेवू, असा इशारा दलित महासंघटनेने दिला आहे. आता याबाबत पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments