google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोरोनाचा पुन्हा उद्रेक, राज्यात लॉकडाऊन लागणार? आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती..

Breaking News

कोरोनाचा पुन्हा उद्रेक, राज्यात लॉकडाऊन लागणार? आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती..

 कोरोनाचा पुन्हा उद्रेक, राज्यात लॉकडाऊन लागणार? आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती..


मुंबई  चीनसह अन्य देशांत पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने भारताची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर, लसीकरण पूर्ण करण्याबरोबरच अन्य उपाययोजना करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिला आहे. 

महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरांत आजपासून (२३ डिसेंबर) मास्क सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोरोनामुळे पुन्हा एकदा टाळेबंदी लागू केली जाणार का? असा प्रश्न पडला आहे. याबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी माहिती दिली आहे.

राज्यात कोरोना आला तरी लॉकडाऊनची शक्यता नाही. सध्या तरी मास्क वापरण्याची सक्ती केलेली नाही. पण नागरिकांनी मास्क वापरावे, असे आवाहन आम्ही करत आहोत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता,

 राज्यातील आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या तसेच योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आपल्याकडे लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहेत. रुग्णालयीन व्यवस्था नीट ठेवण्याच्या सूचना दिल्या असून पूर्ण यंत्रणा सज्ज आहे, असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments