google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जन्मदात्या पित्यानेच केला 20 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार; आईसह तिच्या मित्राचेही पित्याला सहकार्य

Breaking News

जन्मदात्या पित्यानेच केला 20 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार; आईसह तिच्या मित्राचेही पित्याला सहकार्य

 जन्मदात्या पित्यानेच केला 20 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार;

आईसह तिच्या मित्राचेही पित्याला सहकार्य

पुण्यात नात्यांना काळीमा फासणारी घटना घडली आहे. जन्म दात्या पित्यानेच त्याच्या 20 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार  केल्याची धक्कादायक घटना कोंढव्यात घडली आहे.

46 वर्षीय वडील असलेल्या आरोपीने 20 वर्षीय वयाच्या आपल्या मुलीला गेल्या 4 वर्षांपासून पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. लैंगिक अत्याचार करण्यासाठी पीडित मुलीची आई आणि आईचा मित्र हे सर्व आरोपीला मदत करत होते.  पीडित तरुणीवर अत्याचार  करणारा बाप गॅरेजमध्ये कामाला असून, हे मूळचे कुटुंब उडीसा या राज्याचे आहे. 

पुणे: पीडितेवर वाघोली परिसरात असलेल्या एका सोसायटीत आणि कोंढवा परिसरात, आरोपी वडिलाने आपल्या अल्पवयीन मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला  वडील लैंगिक अत्याचार  करत असताना, 

आईचा मित्र हा रोज घरी येऊन पीडित तरुणीला अश्लील बोलून तिच्याशी लगट होण्याचा प्रयत्न करत तिला मानसिक त्रास देऊ लागला होता.  या सर्व त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने पुण्यातील कोंढवा पोलिसात या तिघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

कुटुंब मुळचे ओडिसा राज्यातील : ओडिसा राज्यातील हे कुटुंब असून शारीरिक हव्यासापोटी या व्यक्तीने नात्याची सुद्धा तमा बाळगता स्वतःच्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केले. त्याला अत्याचार करतेवेळी त्याला त्याची आई आणि तिचा मित्र मदत करत होता. आईचा मित्र असलेला सुद्धा तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करून जवळच निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. 

तिन्ही आरोपींना अटक : पोलिसांनी पोक्सो या कलमासह इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तपासासाठी हा गुन्हा लोणीकंद पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना लोणीकंद पोलिसांनी अटक केली असून सध्या ते पोलीस कोठडीमध्ये आहेत.

Post a Comment

0 Comments