सांगोला -मनास लज्जा वाटेल असे कृत्य
माझ्या अंगावर परक्या माणसाने हात टाकला व नव-यास मारहाणकरून जीवे मारण्याची धमकी.. महीलेचा विनयभंग....चौघांविरुद्ध गुन्हा दाखल..
सांगोला :- शालवी प्रविण गायकवाड वर 30 वर्षे, व्यवसाय गृहिणी, रा. वाडेगाव रोड, पवार वस्ती ता. सांगोला मो नं- 9527233096 समक्ष हजर राहुन जबाब देतो की, मी वरील ठिकाणी माझे पती प्रविण मुलगा श्रेयस मुलगी श्रेया असे कुटुंबासह राहणेस असुन माझे पती मजुरी करतात त्यावर आम्ही आमचे कुटुंबाची उपजिवीका भागवीतो. आमचे घरापासून जवळच सुभाष कृष्णदेव पाटील व त्यांची मुले सतिष सुभाष पाटील, संतोष सुभाष पाटील अशी त्याचे बायका मुलांसह रहाणेस आहे.
त्यांचे शेतामधून असलेला नगरपालिकेचा रस्ता आमचे घराकडे येतो. दि-19/12/2022 रोजी दुपारी 1.00 वा. चे सुमारास माझी मुलगी श्रेया की मला घरी सांगत आली की. पप्पांना संतोष पाटील मारत आहेत.
म्हणुन मी सदर ठिकाणी जावून पाहीले असता संतोष पाटील हे नव-याला मारहाण व शिवीगाळी करीत होते. त्यावेळी मी त्यांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा माझी मुलगी उलट्या करु लागल्याने मी माझा नवरा प्रविण यांना मुलीला घेवून सांगोला येथे दवाखान्यात पाठविले होते.
व मी माझे घरी निघून आले. त्यावेळी संतोष पाटील यांनी घरातील बंदूक आण त्याला आज ठेवत नाही अशी दमदाटी केली. त्यानंतर तेथे संतोष पाटील यांचा भाऊ सतिष पाटील हा सुद्धा तेथे आला. तो दारू पिलेला होता. त्या दोघांनी मला ढकलुन देवून लाथामुक्याने मारहाण केली आहे.
तसेच संतोष पाटील यांनी माझ्या अंगावरील साडीचा पदर ओढून माझी छाती दाबून माझे मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले आहे. त्यावेळी सुभांगी संतोष पाटील होने मला धरून ठेवले होते.
त्यानंतर मी दुपारी 3.00 वा. चे सुमारास सुभाष पाटील यांचे घरी जावून त्यांना घडला प्रकार सांगून त्यांचे मुलाबाबत त्यांच्याकडे तक्रार करीत असताना सुभाष कृष्णराव पाटील यांनी मला ए कुत्रे येथून जाते का नाही का माझी मुले तुझ्यावर सोडू का अशी लज्जास्पद भाषा वापरली व मला शिवीगाळ केली आहे.
त्यामुळे मी घरी आले. माझ्या अंगावर परक्या माणसाने हात टाकला व माजे नव-यास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली यामुळे मला टेन्सन आल्याने मी माझे रहाते घरी विषारी औषध प्राशन केले.
तेव्हा मला माझे घरचे लोकांनी मला ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे उपचारास दाखल केले होते. आज रोजी माझी तब्येत ठीक असल्याने पोलीस ठाणेस तक्रार देणेस आली आहे.
तरी दि-19/12/2022 रोजी दुपारी 1.00वा. चे सुमारास माझा नवरा प्रविण यास संतोष सुभाष पाटील हा मारहाण करीत असताना मी नवरा प्रविण यास सोडवून त्यांना मुलगी श्रेया हील दवाखान्यात घेवून सांगोला येथे पाठविले असता संतोष सुभाष पाटील व सतिष सुभाष पाटील यांनी मला
सदर भांडणाचा राग मनात धरून घाणचाण शिवीगाळी करून, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे तसेच संतोष सुभाष पाटील याने माझ्या अंगावरील साडीचा पदर ओढून, माझे छाती दाबून माझ्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले आहे. त्यावेळी शुभांगी संतोष पाटील होने मला धरून ठेवले होते.
तसेच याबाबत मी त्यांचे वडील सुभाष कृष्णराव पाटील यांना सांगितले असता त्यांनी ए कुत्रे येथून जाते का नाही का माझी मुले तुझ्यावर सोडू का अशी लज्जास्पद भाषा वापरली व मला शिवीगाळी केली आहे. म्हणुन माझी त्या चौघांविरुद्ध रीतसर फिर्याद आहे.
पोलीस ठाणे अंमलदार
सांगोला पोलीस ठाणे
0 Comments