निर्भीड पत्रकार चाँदभैय्या शेख यांची पुरस्कारांची नव्वदीपार ; राज्यस्तरीय युवा आयकॉन पत्रकाररत्न पुरस्कार जाहीर
सोलापूर जिल्हाच्या शिर पेचात अजून एक मानाचा तुरा
सांगोला/विशेष प्रतिनिधी लहानपणापासून समाजाची सेवा करण्याची आवड व आपल्या धारदार लेखनीने व पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्य, तळागाळातील गरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे कमी कालावधीतच गरुडझेप घेणाऱ्या
सीबीएस न्युज नेटवर्क चे संपादक व निर्भीड पत्रकार चाँद भैया शेख यांची आता पत्रकारिता क्षेत्रात अजून एक गरुड भरारी घेतली आहे.*भैय्यासाहेबांनी पुरस्काराची नव्वदी पार केली आहे* भैय्यांना युवा पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे दिला जाणारा
*राज्यस्तरीय युवा आयकॉन पत्रकार रत्नपुरस्कार जाहीर करण्यात आला आहे* श्री. चांदभैया शेख यांनी २००७ सालीपासून पत्रकारिता आणि समाजसेवा करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईनच्या स्वरूपात त्यांनी सुमारे १३०० महाराष्ट्रातील लोकांना कोविंड योद्धा या पुरस्काराने सन्मानित केले.
तसेच सीबीएस न्युज मराठी च्या माध्यमातून आतापर्यंत तिन्ही वर्धापन सोहळ्यात सुमारे १७० विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे .विशेषतः गेला पंधरा वर्षात सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य पत्रकारिताच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न निर्भीडपणे शासनापर्यंत मांडले आहेत
तसेच त्यांना आतापर्यंत विविध संस्थेच्या माध्यमातून ८९ राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे त्याची युवा पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे दिला जाणान्या युवा आयकॉन पत्रकार रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
हा त्याना मिळणार ९० वा पुरस्कार आहे .भैय्या हे चळवळीतील कार्यकर्ते, निर्भीड, पत्रकार, मनमिळाऊ स्वभावचे असल्याने त्यांचा दांडगा जण संपर्क आहे. तसेच कामगार कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांना एकजूट करून सतत काम करीत आले आहेत.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य भेडसावणाऱ्या समस्या जनसामान्यांचे न्यायीक विषय सरकार दरबारी मांडणे हे त्यांचे कार्य पाहून जणता सलामी ठोकत आहे विशेषतः राज्यात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, क्रीडा विषयांचे बातमीपत्र गाजले आहेत. ते सीबीएस न्युज मराठी चे मुख्य संपादक आहेत.
आणि त्यांच्या निर्भीड बातम्यांची दखल शासन दरबारी कायम घेतली जात आहे.जनसामान्यांना भेडसावणारे प्रश्न सातत्याने सीबीएस न्युज मराठी च्या माध्यमातून मांडतात, वंचितांचे सोक्षितांचे, पीडितांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांना जाब विचारण्याचे काम चाँदभैय्या आजही धडाडीन करत आहेत.
ज्यांचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहचू शकत नाही अशा अनेकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम गेली अनेक वर्ष निर्भीडपणे करत असल्यानं त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात शुभेच्छा वर्षाव व जल्लोष करण्यात येत आहे.


0 Comments