google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील “पाचेगांव खुर्दच्या इतिहासात प्रथमच सरपंच,सर्व सदस्य बिनविरोध निवड..

Breaking News

सांगोला तालुक्यातील “पाचेगांव खुर्दच्या इतिहासात प्रथमच सरपंच,सर्व सदस्य बिनविरोध निवड..

 सांगोला तालुक्यातील “पाचेगांव खुर्दच्या इतिहासात प्रथमच सरपंच,सर्व सदस्य बिनविरोध निवड..

  सांगोला तालुक्यात सुरु असलेल्या ६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीपैकी चिणके आणि पाचेगाव खुर्द या दोन प्रमुख ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.

यामधील जवळपास सर्व निकाल स्पस्ट झाले आहेत यात बिनविरोध ग्रामपंचायतीवर माजी आमदार दिपकआबा साळुंखे- पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या आघाडीचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे.

प्राप्त माहितीनुसार सांगोला तालुक्यात बलवडी ग्रामपंचायतीचे सर्वच्या सर्व म्हणजे ११ सदस्य व पाचेगांव ग्रामपंचायतचे सरपंचासह सर्व ९ ग्रा.पं. सदस्य आणि अनकढाळ ग्रा.पं.च्या ३ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहेत.

पाचेगांव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शहाजीबापू पाटील गटाच्या सौ. संगीता संजय भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे.

यामध्ये पाचेगांव ग्रामपंचायतच्या सदस्यपदी मिसाळ शिवाजी शेशाप्पा,मिसाळ रंजना हरिबा,मिसाळ अर्चना तात्यासो, हणमंत तुकाराम मिसाळ, सविता विठ्ठल यादव,भंडगे युवराज वसंत, नलवडे दिपाली गणेश,मिसाळ भारत निवृत्ती व इंदुमती सचिन काबुगडे या सर्वच्या सर्व एकूण ९ सदस्यांची बिनविरोध निवड झाली.

तर बलवडी ग्रामपंचायतच्या सदस्य पदीही माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील गटाचे सर्व सुनीता राजेंद्र तोरणे,

शिवाजी नानासो शिंदे,शारदा विलास धायगुडे,समाधान यशवंत शिंदे,बाबासाहेब तुकाराम पालसंडे,सुरेखा विकास पवार, कृष्णदेव धोंडीबा कारंडे, राधा शिवाजी राऊत,नंदा मारुती करडे,सविता सुरेश गुरव, रविराज रमेश शिंदे हे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

अनकढाळ ग्रामपंचायतच्या ३ जागेवर शेतकरी कामगार पक्षाचे शारदा आनंदा काटे,मयुरी विश्वास आदाटे आणि सुनील आनंदा आडसुळ यांची बिनविरोध निवड झाली. अनकढाळच्या सरपंच पदासाठी मात्र ५ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक लक्षवेधी होणार आहे. तर,सदस्य पदाच्या ६ जागांसाठी १५ अर्ज उरले आहेत. 

चिणके ग्रामपंचायतच्या ११ सदस्य जागांसाठी २३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

सांगोला तालुक्यातील बहुचर्चित चिणके ग्रामपंचायतच्या सरपंचपदी दिपकआबा गटाचे नाथा दत्तू खंडागळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

तर, बलवडीच्या सरपंचपदासाठी ४ अर्ज शिल्लक राहिल्याने या निवडणूका रंगतदार होतील. त्याचप्रमाणे, चिंचोली ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी तब्बल ५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

 ११ ग्रामपंचायत सदस्यांसाठी ४३ अर्ज शिल्लक राहिल्याने चिंचोली ग्रामपंचायतची निवडणूक बहुरंगी व लक्षवेधी होणार आहे. या गांवात सर्वपक्षीय तरुणांनी एकत्रित येऊन एक वेगळी आघाडी केल्याने पारंपारिक मातब्बर नेत्यांना यंदाची ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच जाचणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

दुसरीकडे तालुक्यातील आणखी एक महत्त्वाची ग्रामपंचायत असलेल्या शिवणे ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी केवळ २ अर्ज उरले आहेत तर, शिवणे ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी २२ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे ही निवडणूक दुरंगी होणार आहे.

बाकी सांगोला तालुक्यातील चिणके,चिंचोली,पाचेगांव,शिवणे, अनकढाळ आणि बलवडी या ६ ग्रामपंचायतींचा इतर सविस्तर निवडणूक कार्यक्रम सध्या सुरु आहे.याबाबत इतर सविस्तर माहिती घेत आहे.

तर यावेळी बिनविरोध निवडून आलेल्या सरपंच आणि सर्व सदस्यांचा माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी तसेच आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयाच्या वतीने सत्कार करुन नवनियुक्त सरपंच व सदस्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.तर तालुक्यातून विजयी उमेदवार यांचं कौतुक केलं जातं आहे.

Post a Comment

0 Comments