सांगोला तिप्पेहाळी सरपंचपदी शेकापच्या सौ रंजना बजबळकर व उपसरपंचपदी दत्ता नरळे यांची बिनविरोध निवड
कोळा (वार्ताहर):- सांगोला तालुक्यातील तिप्पेहाळी गावच्या नूतन सरपंच पदी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण बजबळकर यांच्या सुविद्य पत्नी रंजना अरुण बजबळकर तर उपसरपंचपदी महाराष्ट्र राज्य ग्रामसंवादचे सांगोला तालुका अध्यक्ष व परिवर्तन मंचचे सदस्य सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे दत्तात्रय बाळू नरळे यांचे निवड झाल्याने
नूतन सरपंच , उपसरपंच यांचे अभिनंदन करतो. बिनविरोध करून केलेले कार्य कौतुकास्पद गौरवास्पद आहे, असे विचार शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी संघटनेचे प्रदेशाध्यक्षडॉ. बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.
तिप्पेहाळी ता. सांगोला ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच पदी शेकापच्या सौ रंजना अरुण बजवळकर व उपसरपंचपदी दत्तात्रय बाळू नरळे दोघांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवडणूक झाली असल्याची घोषणा निवडणूक पीठासन अधिकारी एम एन नाईकननवरे यांनी केली.
तलाठी बोदमबाड ग्रामसेवक प्रदीप लोहार पोलीस पाटील राजू करांडे पत्रकार जगदिश कुलकर्णी यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते ग्रामस्थांच्यावतीने नूतन सरपंसौ. रंजना बजबळकर उपसरपंच दत्तात्रय न यांचा सत्कार संपन्न झाला.
या कार्यक्रमास माजी सभापती संभाजीतात्या आलदर, माजी जि.प सदस्य गजेंद्र कोळेकर, सचिन देशमुख, विलासराव देशमुख, उद्योगपती अशोक आबा नरळे-फलटणे, माजी सरपंच सिताराम सरगर, माजी सरपंच बाबासो नरळे- फलटणे, माजी सरपंच अरुण बजबळकर,
तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष श्रीमंत अण्णा बजवळकर, भगवान सांगोलकर गुरुजी, दीपकराव तेली भगवान वस्ताद नरळे, लक्ष्मण नरळे, डेरी मैनेजर पांडुरंग नरळे-फलटणे, प्रकाश माने, विश्वनाथ सांगोलकर सर, दीपक गोडसे, नाथा घरडे, ज्ञानू पांढरे, गौतम करांडे,
दादासाहेब बजवळकर, पैलवान हरिभाऊ सरगर, ज्येष्ठ नेते ईश्वर घाडगे, कुंडलिक आलदर रफिक भाई तांबोळी शहाजी हातेकर, दिलीप देशमुख, राजू देशमुख, धनाजी सरगर, शामराव बजवळकर, विलास होनमाने, भागवत बाघमोडे, ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन विश्वनाथ सांगोलकर व आभार इंजिनीयर उद्योगपती अशोक आबा नरळे फलटणे यांनी मानले.च


0 Comments