सांगोला- मंगळवेढा-सोलापूर नवा रेल्वेमार्ग करा खा. डॉ. महास्वामी : लोकप्रतिनिधी, रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घ्या
सोलापूर: सांगोला येथील प्रसिद्ध zifaa. मंगळाची प्रसिद्ध ज्वारी तसेच सोलापूर अध्यात्मिक नगरीस जोडणारा सांगोला- मंगळवेढा- सोलापूर नवीन रेल्वे मार्ग झाल्यास जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळेल. त्यामुळे या नवीन रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण करून मंजुरी देण्याबाबत संयुक्त बैठक बोलाविण्यात यावी,
अशी मागणी खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली आहे.
संसदेच्या हिवाळीअधिवेशनातील दुसऱ्या आठवडयात, बुधवारी लोकसभा सत्रात खा. डॉ. महास्वामींनी हा प्रश्न मांडला. ते म्हणाले, जिल्ह्यातील सांगोला ते सोलापूर हे अंतर सुमारे ८५ किलोमीटर आहे.
सांगोलासह जिल्ह्यात चांगल्या प्रतीचे डाळिंबाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सांगोल्यातील डाळिंब परदेशातही निर्यात केले जातात. वासोबतचमंगळवेढ्याची ज्वारी प्रसिद्ध आहे. मंगळवेढा ज्वारीला देशभरात मागणी आहे.
विशेषत: शेतकऱ्यांना शहराच्या बाजारपेठेशी जोडण्यासाठी आणि वाढत्या शहरीकरणाच्या दृष्टीने रेल्वे हे अत्यंत किफायतशीर वाहतुकीचे साधन आहे. त्यामुळे हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यास सांगोला व मंगळवेढा येथील शेतकऱ्यांना आपला माल सोलापूरलाच नव्हे, तर देशातील इतर शहरातही पाठविण्याची सुविधा मिळू शकेल.
अनेक शेतकरी व व्यावसायिकांनी सांगोला मंगळवेढा ते सोलापूर ही रेल्वे सेवा सुरू करावी, अशा मागण्यांचे निवेदन वापूर्वी दिले आहे.
मंगळवेढा येथील आमदार, लोकप्रतिनिधी यांनीही रेल्वे मंत्रालयाला याबाबत मागणीचे निवेदन दिले आहे. या मार्गाच्या सर्वेक्षणाबाबत मंगळवेढा, सांगोला व सोलापूरचे लोकप्रतिनिधी व रेल्वे मंत्रालयाच्या अधिकान्यांची संयुक्त बैठक बोलावून या मार्गाला मंजुरी द्यावी, अशी मागणी खा. डॉ. सांगोला व मंगळवेढा येथील महास्वामी यांनी केली.


0 Comments