google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला सहा ग्रा.पं.च्या निवडणुकांसाठी १०५ अधिकारी व कर्मचारी अभिजित पाटील : तीन पोलिस अधिकारी, ४० कर्मचारी तसेच २५ होमगार्ड अशा एकूण ६८ जणांच्या नियुक्त्या

Breaking News

सांगोला सहा ग्रा.पं.च्या निवडणुकांसाठी १०५ अधिकारी व कर्मचारी अभिजित पाटील : तीन पोलिस अधिकारी, ४० कर्मचारी तसेच २५ होमगार्ड अशा एकूण ६८ जणांच्या नियुक्त्या

सांगोला सहा ग्रा.पं.च्या निवडणुकांसाठी १०५ अधिकारी व कर्मचारी अभिजित पाटील : 

तीन पोलिस अधिकारी, ४० कर्मचारी तसेच २५ होमगार्ड अशा एकूण ६८ जणांच्या नियुक्त्या

६ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार व शासकीय नियमानुसार पार पाडण्यासाठी १०५ अधिकारी कर्मचारी तर सदरची

 निवडणूक कायदा व सुव्यवस्था आबाधीत राखून शांततेत पार पाडण्यासाठी ३ पोलीस अधिकारी ४० कर्मचारी तसेच २५ होमगार्ड असे एकूण ६८ यांच्या नियुक्त्या करण्यात आले असल्याची माहितीत तहसीलदार अभिजीत पाटील यांनी दिली.

सांगोला तालुक्यातील मुदत संपलेल्या चिंचोली, शिवणे, अनकढाळ, बलवडी,पाचेगाव खुर्द, चिनके या ६ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. सांगोला तालुक्यातील पाचेगाव खुर्द ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. तर चिनके सरपंचपद बलवडीच्या ११ सदस्यांसह अनकढाळ ग्रामपंचायतीचे ३ सदस्य ही बिनविरोध झाले आहेत.

 चिंचोली, शिवणे, अनकढाळ, बलवडी सरपंच पद व सदस्य पदाच्याप्रचाराची रणधुमाळी सुरू असून ६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी १८ तर सदस्य पदासाठी १२६ इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

पाचेगाव खुर्द ग्रामपंचायत वगळता उर्वरित ५ ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेसाठी पाच ग्रामपंचायतीमध्ये २१ बूथ तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक बुथवर मतदान अधिकारी व कर्मचारी व शिपाई असे एकूण १०५ कर्मचारी अधिकारी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार अभिजीत पाटील यांनी दिली आहे.

 ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पारपाडण्यासाठी कोठेही अनुचित प्रकार घडू नये, शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत, मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी ३ पोलीस अधिकारी ४० कर्मचारी तसेच २५ होमगार्ड असे एकूण ६८ कर्मचारी अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

मतदान प्रक्रिया दरम्यान व आचारसंहिता कालावधीमध्ये निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करू नये अन्यथा निवडणूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कडक कारवाई केली जाईल असा इशारा देखील पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments