google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ग्रामपंचायत निवडणुकीत भाषण संपवून बसले आणि काही वेळात स्टेजवरच निधन

Breaking News

ग्रामपंचायत निवडणुकीत भाषण संपवून बसले आणि काही वेळात स्टेजवरच निधन

ग्रामपंचायत निवडणुकीत भाषण संपवून बसले आणि काही वेळात स्टेजवरच निधन

सरपंचपदाच्या निवडणुकीत पत्नीचा प्रचार करताना स्टेजवरच पतीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयदावक घटना लाटून जिल्ह्यात घडली आहे.

सद्या राज्यात विविध ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरु असल्याने गावागावात निवडणुकीची धूम सुरु आहे. 

थेट सरपंचपदाची निवडणूक होत असल्यामुळे या निवडणुकीत अधिक चुरशीचे वातावरण आहे. धुमधडाक्यात प्रचार सुरु असून गावागावात या निवडणुकांची चर्चा सुरु असतानाच लातूर जिल्ह्यातील मुरुड येथून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेने गाव हळहळले असून उत्साही प्रचारातील रंगत निघून गेली आहे.

 ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाची निवडणूक लढविण्यासाठी अमृता अमर नाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रचारही धुमधडाक्यात सुरु होता परंतु सरपंच होण्याच्या आधीच त्यांना वैधव्य आले आहे. 

मुरुड ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंचपदाची निवडणूक ऐन रंगात आलेली असतानाच मोठी दुर्घटना घडली. सरपंचपदाच्या उमेदवार अमृता नाडे यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत अनेक वक्त्यांनी भाषणे केली. 

अमृता नाडे यांचे पती अमर पुंडलिक नाडे यांनीही आपल्या पत्नीच्या प्रचारासाठी या प्रचार सभेत भाषण केले. आणि ते व्यासपीठावरील खुर्चीवर जाऊन बसले. प्रचार सभा रंगात आलेली होती आणि शेवटच्या वक्त्याचे भाषण सुरु होते. याच दरम्यान अमर नाडे यांना त्रास जाणवू लागला. 

आपल्याला अस्वस्थ वाटू लागल्याचे त्यांनी आपल्या उमेदवार पत्नीलाही सांगितले. पत्नी काही हालचाल करणार एवढ्यात ते स्टेजवरील खुर्चीवरून खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्यांना तपासले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ४३ वर्षाचे अमर नाडे हे मुरुड येथील तरुण व्यावसायिक, ग्रामपंचायत सदस्य तसेच अष्टविनायक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांचे व्यासपीठावरच निधन झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. 

आपल्या पत्नीच्या निवडणूक प्रचाराच्या स्टेजवर अशा प्रकारे मृत्यू आल्याने गावात प्रचंड हळहळ व्यक्त होऊ लागली आहे. स्टेजवरच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि झटका एवढा तीव्र होता की उपचारापूर्वीच त्यांचा शेवट झाला.

Post a Comment

0 Comments