google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यातील तांड्यांवर पुन्हा हातभट्ट्या सुरू

Breaking News

सोलापूर जिल्ह्यातील तांड्यांवर पुन्हा हातभट्ट्या सुरू

सोलापूर जिल्ह्यातील तांड्यांवर पुन्हा हातभट्ट्या सुरू 


सोलापूर : 'ऑपरेशन परिवर्तन'च्या माध्यमातून जिल्ह्यातील तांड्यांवरील बंद झालेल्या दारूच्या हातभट्ट्या आता पुन्हा पेटत असल्याची स्थिती आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईतून त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.मंगळवारी (ता. ६) पहाटेच्या सुमारास बक्षीहिप्परगा तांड्यावरील 

(ता. दक्षिण सोलापूर) हातभट्ट्यांवर धाडी टाकून उत्पादन शुल्क विभागाने तब्बल तीन लाखांचा मुद्देमाल नष्ट केला. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभाग पंढरपूरचे दुय्यम निरीक्षक अंकुश आवताडे यांनी मंगळवारी (ता. ६) सायंकाळच्या सुमारास खंडाळी ते खंडाळी पाटी रोडवर 

(ता. मोहोळ) सापळा रचून कारमधील (एमएच १२, एचव्ही ५७९०) देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला. वाहनचालक बालाजी बबन खडके (रा. टेंभुर्णी, ता. माढा) यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.

एक लाख ३४ हजाराचा मद्यसाठा व दोन वाहने असा एकूण सहा लाख दोन हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल त्या पथकाने हस्तगत केला. दुसरा संशयित आरोपी सचिन बनसोडे हा पसार झाला असून त्याचा शोध सुरु आहे. 

दुसरीकडे बक्षीहिप्परगा तांड्याजवळील सेवालाल तांड्यावर छापा टाकला. नवनाथ खेमा राठोड याच्या घरातून ८ रबरी ट्यूबमध्ये ६४० लिटर हातभट्टी आणि द्वारकाबाई कोंडिबा राठोड हिच्या घरातील २२ रबरी ट्यूबमधून दोन हजार २०० लिटर हातभट्टी दारू जप्त केली.

 गणपत तांडा परिसरातील हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून विजय मानसिंग चव्हाण व संजय थावरु पवार याच्या ताब्यातून ३६ प्लास्टिक बॅरेलमधील गुळमिश्रित रसायन नष्ट केले. दोन हजार ८४८ लिटर हातभट्टी दारू व सात हजार २०० लिटर रसायन असा एकूण तीन लाख सात हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त केला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक सूरज कुसळे, संभाजी फडतरे, सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक अंकुश आवताडे, शंकर पाटील, उषाकिरण मिसाळ, सुनील पाटील, 

गणेश उंडे, सहायक दुय्यम निरिक्षक जीवन मुंढे, सिद्धराम बिराजदार, गजानन होळकर, जवान गणेश रोडे, विकास वडमिले, मलंग तांबोळी, भाग्यश्री शेरखाने, प्रियंका कुटे, अनिल पांढरे, अण्णासाहेब कर्चे, प्रशांत इंगोले व वाहनचालक रशीद शेख, रामचंद्र मदने व मारुती जडगे यांच्या पथकाने कारवाई पार पाडली.


Post a Comment

0 Comments