google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 तोतया शिक्षक मोहन शिंदे यांची चुकीची शिक्षक मान्यता रद्द करा : शिवाजीराव जावीर

Breaking News

तोतया शिक्षक मोहन शिंदे यांची चुकीची शिक्षक मान्यता रद्द करा : शिवाजीराव जावीर

 तोतया शिक्षक मोहन शिंदे यांची चुकीची शिक्षक मान्यता रद्द करा : शिवाजीराव जावीर

मुंबई : संगम विद्यालय डोंगरगाव तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या प्रशालेतील संस्थेची नेमणूक नसलेले तोतया शिक्षक कर्मचारी मोहन तुकाराम शिंदे यांना शिक्षण अधिकरी (माध्य) जि. प. सोलापूर यांनी दिनांक 5 जानेवारी 1996 च्या पत्रान्वये दिलेली नियमबाह्य व चुकीची शिक्षक मान्यता रद्द करण्यात यावी, 

अशी मागणी स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे संस्थापक शिवाजीराव जावीर यांनी बुधवार दिनांक 7 डिसेंबर 2022 रोजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना मुंबई येथे भेटून केली.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की संस्थेने शिंदे यांची नेमणूक अर्धवेळ शिक्षक म्हणून सन 1995-96 या एकाच वर्षाकरिता केली होती सन 1995-96 या शैक्षणिक वर्षानंतर संस्थेने शिंदे यांना कसल्याही प्रकारचे नियुक्ती आदेश दिलेले नाहीत

 तथापि शिक्षण अधिकारी यांनी दिनांक 5 जानेवारी 1996 च्या पत्रान्वये शिंदे यांना नियमबाह्य व चुकीची शिक्षक मान्यता दिली असून सदरची मान्यता संस्थाचालक व मुख्याध्यापक यांनी जाणीवपूर्वक व खोडसाळपणे sponsored केलेली आहे.

सदर प्रकरणी शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे -1 यांनी अनेक वेळा सुनावण्या घेतल्या असून सदरची नियमबाह्य मान्यता जाणीवपूर्वक रद्द केली नाही

 त्यामुळे शासनावरती कोट्यावधी रुपयांचे आर्थिक उत्तरदायित्व निर्माण झाले असल्याचे जावीर यांनी मंत्री केसरकर यांच्या निदर्शनास आणून दिले . यावेळी मंत्री दिपक केसरकर यांच्या भेटी प्रसंगी शिवाजीराव जावीर यांच्या सोबत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वैद्यकीय कक्षाचे सोलापूर जिल्हा उपप्रमुख संजय गेजगे हेही उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments