सावधान.. बाटली लावली जर नोझलला; पंपचालक लागलाच मग कामाला !
विक्री व्यवस्थापकाची नजर : जिल्ह्यात पंपाची संख्या वाढली
सोलापूर काही घातपातांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काही वर्षांपूर्वी पंपावर बाटलीत पेट्रोल देण्यावर बंदी आली. सोलापूर शहरात हा बंदी आदेश पाळला जातोय. ग्राहकांशी वादविवादाचा प्रसंग नको म्हणून पंपाबाहेर बाटलीत पेट्रोल मिळणार नसल्याचे फलक लावले आहेत.जीवनावश्यक वस्तूमध्ये मोडणा-या पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत राहिले आहेत. जसे दर वाढत गेले तसे ग्राहक जागृक होत गेले.
बहुतांश पंपावर पेट्रोल देण्याची वेळ, हवा भरण्याची सुविधा आणि सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीची करण्यात आले आहेत. काही पंपांवर टोल फ्री नंबरही दिला आहे. ग्राहकाची समाधानता यावर पेट्रोलियम कंपन्यांनी भर दिला असून नियमावली कडक केली आहे. इतकेच नव्हे तर इंधन घेऊन येणा-या वाहनांच्या नोंदी ठेवल्या जातात.
सोलापूर शहरात विविध कंपन्यांचे जवळपास २४ पंप असून, ग्रामीण भागात ही संख्या ३०० वर आहे. अलीकडे वाहनांची संख्या वाढलेली असून मागणी आणि पुरवठा वाढलेला आहे. बऱ्याचदा मुंबई, मनमाड येथून वितरकांना सॅम्पल बॉक्स पुरवले जातात.
मात्र, कोणत्याही वाहनधारकाला बाटलीतून पेट्रोल पुरवण्यावर निर्बंध आहेत. वाहन ढकलत आणूनच पंपावर पेट्रोल घ्यावे लागेल. आजपर्यंत अशा प्रकारे नियम तोडून इंधन दिल्याची तक्रार आली नाही आणि तशी कारवाई झालेली नसल्याचे भारत पेट्रोलियमचे सेल्स मॅनेजर मनीष कमार यांनी सांगितले....
बाटलीत पेट्रोल-डिझेल देणे गुन्हा काही वर्षांपूर्वी पेट्रोल टाकून जाळून मारण्याच्या घटनानंतर सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून शासनाने बाटलीतून पेट्रोल देण्यावर बंदी आदेश काढला. या आदेशानंतर शहरातील पेट्रोलपंपचालकांची बैठक झाली. या बैठकीत बाटलीतून पेट्रोल देण्यावर आलेल्या बंदीची अंमलबजावणी करण्यावर चर्चा झाली.
आतापर्यंत किती पंपांवर कारवाई केली?
शहरात जेवढे पेट्रोलपंप आहेत त्याहून अधिक पंपाची संख्या ही ग्रामीण भागात आहे. विविध कंपन्यांचे पंप असून, या पंपावर बाटलीतून पेट्रोल दिले जात नसल्याने अलीकडच्या काळात संबंधित पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आढळून आले नाहीत. परंतू सर्वसामान्य जागरुक असल्याने कारवाई नाही.'लोकमत'ने काय पाहिले?
1 विजापूर रोड : शहरात विजापूर रोडवर दोन पंप असून, त्यापैकी एक एसआरपी कॅम्प येथे पोलिस पेट्रोलपंप आहे. या दोनही पंपांवर बाटलीतून पेट्रोल मिळणार नसल्याचे फलक लावलेले आढळून आले.
डफरीन चौक : डफरीन चौकातील दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या दोन 2 पपावरही सोमवारी गर्दी होती. मात्र, काही वाहनचालक हे स्वतःची दुचाकी ढकलत पंपावर आले आणि टाकीत पेट्रोल टाकताना पाहायला मिळाले. येथे नियमावलीची अमलबजावणी दिसून आली.
3 हैदराबाद रोड हैदराबाद रोडवरही बाजार समितीच्या अलीकडे आणि मुळेगावच्या अलीकडे अशा दोनही पंपावर नियमाची अंमलबजावणी दिसून आली. याही पंपावर बाटलीतून पेट्रोल मिळणार नसल्याचे फलक लावल्याचे निदर्शनास आले. या मार्गार दुचाकीपेक्षा जड वाहनांची डिझेलसाठी गर्दी दिसून आली. येथेही कोणी जड वाहनचालक बाटलीतून पेट्रोल मागितल्याचे उदाहरण पुढे आले नाही.


0 Comments