google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नाझरे-चोपडी पंचायत समिती गण राज्यात टॉप बनवणार : युवा नेते ॲड विक्रमसिंह पाटील

Breaking News

नाझरे-चोपडी पंचायत समिती गण राज्यात टॉप बनवणार : युवा नेते ॲड विक्रमसिंह पाटील

 नाझरे-चोपडी पंचायत समिती गण राज्यात टॉप बनवणार : युवा नेते ॲड विक्रमसिंह पाटील

सांगोला प्रतिनिधी; नाझरे-चोपडी पंचायत समिती गणातून नवीन  तरूण,तडफदार, उच्चशिक्षित,सुशिक्षित युवक, निवडणुकीच्या रिंगणात येतोय, युवा नेते ॲड विक्रमसिंह पाटील यांची मुलाखत घेतली असता त्यांनी परखडपणे मत व्यक्त केले की,

येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये जनतेला पूर्ण वेळ असा पंचायत समिती सदस्य पाहिजे. अशी जनतेमधून मागणी आहे. असे त्यांनी सांगितले.

नाझरे, चोपडी, करांडेवाडी, बुद्धेहाळ, बलवडी,वझरे, सोमेवाडी, बंडगरवाडी, इत्यादी गावातील लोकांना तालुक्यावरील हेलपाटे बंद करणार आणि त्यांचे प्रश्न त्यांच्या गावांमध्ये सोडवणार, महिन्यातून एक दिवस प्रत्येक गावामध्ये राहुटी करून त्या गावातील सर्व प्रश्न मार्गी लावणार, 

सहा महिन्यातून एकदा, बी.डि.ओ. तहसीलदार, पोलीस निरीक्षक, इत्यादी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कॅम्प आयोजित करून पाच गावातील प्रश्न पाच गावांमध्येच पूर्ण झाले पाहिजेत, या पाच गावातील रस्ते, लाईट,पाणी

 ,आरोग्य, शिक्षण, सामाजिक न्याय इत्यादी गोष्टींना प्राधान्य देऊन पंचायत समिती गणाचा सर्वांगीण विकास करणार, या पाच गावातील कोणतीही समस्या असेल त्या-त्या संबंधित राज्यातील मंत्रालयीन विभाग असेल तसेच जिल्हा नियोजन समिती असेल, त्याचबरोबर तालुका पंचायत समिती असेल, 

इत्यादी विभागाशीं पाठपुरावा करून सर्व प्रश्न मार्गी लावण्यास कटीबद्ध आहे असे सांगितले,  या पंचायत समिती गणातील जनतेने जर संधी दिली, तर पाच वर्ष दिवसातील बारा तास वेळ देऊन, तेथील जनतेचे प्रश्न तात्काळ मार्गी लावणार, असे यावेळी त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी हेही सांगितले की, नाझरे-चोपडी पंचायत समिती गणातील 

वीस हजार मतदार बांधवांच्या दारी आणि शेतबांधावरती स्वतः लवकरच येणार, आपल्या समस्या आणि प्रश्नानांनवरती संवाद साधणार 

सर्वसामान्य गोरगरीब  कुटुंबातील एक तुमचा  तरुण तडफदार, उच्च विद्याविभूषित , शिक्षित, सुशिक्षित, 

पंचवीशीतील युवक, मुलगा, फक्त एकदा संधी द्या..! असेही ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments