google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सावधान...सोशल मीडियावर शहाजीबापूंच्या व्यक्तिगत आयुष्यावर आक्षेपार्ह लिखाण कराल तर अशा लोकांवर लवकरच कायदेशीर गुन्हे दाखल करणार माजी पंचायत समिती सदस्य ॲड.बंडू काशीद यांनी दिला आहे.

Breaking News

सावधान...सोशल मीडियावर शहाजीबापूंच्या व्यक्तिगत आयुष्यावर आक्षेपार्ह लिखाण कराल तर अशा लोकांवर लवकरच कायदेशीर गुन्हे दाखल करणार माजी पंचायत समिती सदस्य ॲड.बंडू काशीद यांनी दिला आहे.

 सावधान...सोशल मीडियावर शहाजीबापूंच्या व्यक्तिगत आयुष्यावर आक्षेपार्ह लिखाण  कराल

तर अशा लोकांवर लवकरच कायदेशीर गुन्हे दाखल करणार माजी पंचायत समिती सदस्य ॲड.बंडू काशीद यांनी दिला आहे. 

सोशल मीडियावर आमदार शहाजीबापूंबद्दल आक्षेपार्ह लिखाण कराल तर सावधान... व्यक्तिगत आणि कौटुंबिक मुद्द्यावर बोलून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा विरोधकांचा डाव आहे.

सांगोला : सतत प्रसिद्धीच्या झोतात असणारे सांगोल्याचे झाडी,डोंगारफेम आमदार शहाजीबापू पाटील यांच्याविषयी सोशल मीडियावर कोणताही आधार किंवा पुरावा नसताना आक्षेपार्ह लिखाण करणे आता नेटिझन्सला चांगलेच भोवणार आहे.

ज्यांनी सोशल मीडियावर शहाजीबापूंच्या व्यक्तिगत आयुष्यावर आक्षेपार्ह लिखाण आणि भाष्य केले आहे, अशा लोकांवर लवकरच कायदेशीर गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा माजी पंचायत समिती सदस्य ॲड.बंडू काशीद यांनी दिला आहे. 

सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील हे केवळ राज्यात नाही तर संपूर्ण देशभर प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका केल्यास आपलीही कोणीतरी दखल घेईल, या उद्देशाने सध्या सोशल मीडियावर शहाजीबापूंबद्दल कोणताही कायदेशीर पुरावा नसताना आणि कोणतीही तक्रार नसताना काही मंडळी विनाकारण राजकीय,

सामाजिक आणि व्यक्तिगत प्रतिमा मलिन करण्यासाठी त्यांच्यावर बेच्छुट आरोप करीत आहेत. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलावे विनाकारण ज्या गुन्ह्यात न्यायालयाने आमदार शहाजीबापूंची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यावर भाष्य करू नये आणि खासगी व कौटुंबिक आयुष्यात डोकावू नये, असेही यावेळी ॲड.काशीद यांनी स्पष्ट केले.

वर्षानुवर्ष सांगोला तालुक्यात प्रलंबित असलेली विकास कामे शहाजीबापूंनी आपल्या कार्यकाळात मार्गी लावली आहेत.सांगोल्याचा बहुचर्चित पाणीप्रश्न देखील आमदार शहाजीबापू पाटील यांनीच मार्गी लावला आहे.सध्या विकासाच्या बाबतीत आमदार शहाजीबापू पाटील यांची गाडी सुसाट सुटल्याने त्यांच्या राजकीय विरोधकांकडे कोणतेही भांडवल उरले नाही. 

त्यामुळे कोणताही आधार नसताना जाणीवपूर्वक उठ-सुट शहाजीबापू पाटील यांच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक मुद्द्यावर बोलून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा विरोधकांचा डाव आहे.परंतु शहाजीबापू पाटील हे अशा टीकाकारांना भीक घालणारे नाहीत.

ज्यांनी जाणीवपूर्वक शहाजीबापूंना बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू केले आहे, त्यांची आता गय करणार नाही. त्यांच्या विरोधात लवकरच गुन्हे दाखल करणार आहे ,असे सांगून यापुढे कुणीही शहाजीबापूंविषयी समाजमाध्यमात आक्षेपार्ह भाषेत लिखाण किंवा भाष्य केल्यास, अशा मंडळींना कायदेशीर भाषेत उत्तर देऊन त्यांना न्यायालयात खेचणार असल्याचेही काशीद यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments