जेंडर संसाधन केंद्रामार्फत समुपदेशन करुन समाजात स्री-पुरुष समानता निर्माण करणे,ही काळाची गरज – सीईओ दिलीप स्वामी
सांगोला :महिलांच्या विविध सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी तालुकास्तरावर एक पूर्ण वेळ कार्य करणारी संस्था असणे आवश्यक आहे.
त्यासाठीच जेंडर संसाधन केंद्राची निर्मिती करण्यात आली असून त्या केंद्राच्या माध्यमातून समुपदेशन करून स्री-पुरुष समानता समाजात निर्माण करणे ही काळाची गरज आहे,असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
सांगोला तालुक्यातील सक्षम प्रभाग संघ, कडलास येथील अग्निपंख जेंडर संसाधन केंद्राच्या उदघाटन प्रसंगी सीईओ दिलीप स्वामी हे बोलत होते. महाराष्ट्र राज्यातील ४ जेंडर संसाधन केंद्राचे उदघाटन प्रातिनिधिक स्वरूपात ऑनलाइन पद्धतीने
भारताच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना दिलीप स्वामी पुढे म्हणाले की,सद्य:स्थितीत महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत. त्यामुळे यापुढे समाजात स्री पुरुष समानता प्रस्थापित करणे
आवश्यक असून सत्तेत जसा महिलांचा अर्धा वाटा आहे तसाच, संसारात व व्यावहारिक जीवनात सुद्धा त्यांना अर्धा वाटा देण्याची गरज आहे. तसेच लिंग भाव समानता प्रस्थापित होणे आवश्यक आहे. यावेळी, अग्निपंख जेंडर संसाधन केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमाची रुपरेषा दिलीप स्वामी यांनी सांगितली.
यावेळी प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी, सहाय्यक गटविकास अधिकारी विकास काळोखे, बालविकास प्रकल्प अधिकारी आस्मा आतार,
गटशिक्षण अधिकारी नाळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे,जि.प. बांधकाम विभागाचे उपअभियंता नकाते, जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे,मिनाक्षी मडीवली,अमोल गलांडे उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अभियान व्यवस्थापक कृनाल पाटील,
अमोल सावंत, महंतवीर घाडगे, सुधीर पिसे, महेश साठे,किशोर बिडे,सचिन भोसले, अभिजित महादेवकर, राहूल माने, अजित वाघमारे, सुजित हेगडे, दिपक गाडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा ढेबे यांनी केले तर, आभार प्रदर्शन जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे यांनी केले.


0 Comments