पंचगव्य औषधी निर्माण करून रुग्णांना रोग मुक्त करणारे डॉ प्रवीण निचत
ह्यांचा गौ भारत भरती तर्फे मा. कृपाशंकर सिंह यांच्या हस्ते मुंबईत जाहीर सत्कार
हल्ली जिथे लोक दूध न देणाऱ्या गाईंना रस्त्यावर सोडून देतात किंवा कत्तलखान्यात पाठवतात अश्या वेळी डॉ प्रवीण निचत (अध्यक्ष होप फौंडेशन) ह्यांनी त्याच गाईंपासून गोमूत्र व दही मिसळून जैविक खत व पंचगव्य औषधी निर्माण करून आपल्या भूमातेला सकस व रुग्णांना निरोगी करण्याचा विडा उचलला आहे.
त्यांच्या ह्याच समाजकार्याला सलाम करून पुन्हा एकदा गऊ ग्राम महोत्सवात मा. कृपाशंकर सिंह, उपाध्यक्ष भाजप, महाराष्ट्र आणि राज्य सरकारचे माजी गृहमंत्री ह्यांच्या हस्ते डॉ प्रवीण निचत ह्यांचा सन्मानपूर्वक पुरस्कार देऊन सत्कार केला व ह्या संदर्भात काहीही आवश्यकता लागल्यास मदद करण्याचे आश्वासन दिले.
गऊ ग्राम महोत्सव मुख्य आयोजक संजय अमान ह्यांनी कार्यक्रमाच्या आपल्या परंपरेनुसार काही सामाजिक, गोसेवक, प्रशासकीय अधिकाऱ्यांना माननीय कृपाशंकर सिंह, उपाध्यक्ष भाजप, महाराष्ट्र आणि राज्य सरकारचे माजी गृहमंत्री. यांच्या हस्ते “गौ भारत भारती सर्वोत्तम सन्मान” प्रदान करण्यात आला.
2022 वर्षाच्या सर्वोत्कृष्ट प्राप्तकर्त्यांमध्ये प्रमुख लक्ष वेधले ते म्हणजे गाईच्या दूध, दही, शेण, गोमूत्र व तूप ह्या पंचगव्याने तयार केलेले औषधी निर्माण करून त्यांचा उपयोग रोग्यांना कसा करून त्यांचे आरोग्य सुधारण्या साठी वापर केला जाऊ शकतो ते डॉ प्रवीण निचत ह्यांनी समजून सांगितले.
डॉ प्रवीण निचत ह्यांनी गेले कित्येक वर्ष संशोधन करून पंचगव्य औषध निर्माण करून ते रोग्यांना देऊन त्यांना रोगमुक्त केले. त्या अनुषंगाने गो भारत भरती ह्या संस्थेने त्यांची दाखल घेऊन मार्च २०२२ मध्ये त्यांना मा. राज्यपाल भगतसिंग कोषारी, ह्यांचा हस्ते पुरस्कृत करण्यात आले व त्यांचा पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


0 Comments